रोहा तालुक्यातील ग्रामिण भागात कोरोनाचा शिरकाव,८ कोरोना पाॅझिटीव्ह रूग्ण एकुण संख्या १३…

[avatar]

रोहा तालुक्यातील ग्रामिण भागात कोरोनाचा शिरकाव,८ कोरोना पाॅझिटीव्ह रूग्ण एकुण संख्या १३…

रोहा (नारायण खुळे)रोहा तालुक्यात खऱ्या अर्थाने कोरोनाची लागण सुरू झाली असून  तालुक्यात आज (23 मे) रोजी पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. (२५ मे) रोजी आठ कोरोना पाॅझिटीव्ह रूग्ण आहे.यामध्ये तिन ऐनवहाळ आणि एक  (पाले खु.) व एक (पाले बु.महाबळे पाडा  कोलाड परिसरातील आहेत.तसेच घोसाळे विभागातील भालगाव एक तसेच एक कांटी, व एक सुखदरवाडी कोव्हीड-19 टेस्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती रोहा तहसील कार्यालयातुन प्राप्त झाली आहे
             रोहा तहसीलदार कविता जाधव यांनी दिलेल्या माहिती नुसार अखेर येथील बाधित रुग्णांची संख्या १३ झाली असून रोहा तालुक्यातील घोसाळे ग्रामपंचायत हद्दीतील सुखदरवाडी येथील एक जणला,भालगाव एक,कांटी एक  लागण झाली असून एकाच दिवशी आठ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने सबंध रोहा तालुका हादरून गेल्याने एकच खळबळ उडाली असून. त्यांना कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याने स्वबचे नमूने जे जे रुग्णालय मुंबई येथे एकुण ३५ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.त्यापैकी ३३ व्यक्तींचे स्वॅब प्राप्त झाले असून आठ व्यक्ती कोरोना बाधित आहेत.संपर्कात आलेल्या ८ व्यक्ती पैकी १ व्यक्ती जिल्हा रुग्णालयात अलिबाग व ७ रूग्णांना पनवेल येथे उपचारार्थ  हलविण्यात आले आहेत तसेच संबधित रुग्णांचा कोठे कोठे संपर्क झाला आहे का. यांची अधिक माहिती प्रशासकीय यंत्रणा करत आहे,परंतु मोठ्या लॉक डाऊन नंतर मुबंईतून आलेल्यांना ही लागण झाल्याने  परिसरातील ग्रामीण भागात
भीतीचे वातावरण पसरले आहे.
संपूर्ण जग कोरोना महामारीच्या संकटात तसेच देशात व राज्यात त्याचा वाढता पादुर्भाव निर्माण झाला असून बाधितांच्या संख्येत दिवसंदिवस मोठी वाढ होत आहे मोट्या लॉक डाऊनच्या कालावधीत देखील कोरोना संसर्ग विषाणूचा गुणाकार हा पटीपटीने वाढत आहे सुरवातीच्या काळात रायगड जिल्ह्यत एक रुग्ण आढळून आला परंतु आज त्याची संख्या आठशे च्या जवळ पास पोहचली आहे रोहा  तालुक्यात ग्रामिण भागात कोरोनाची लागण झपाट्याने झाली आहे. परंतु 23 मे रोजी एकाच दिवशी रोहा तालुक्यात ऐनव्हाल तीन आणि भालगाव दोन असे कोरोनाचे पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ माजत होती.
 तरी त्यांच्यावर अलिबाग येथे योग्य उपचार सुरू आहेत अशी माहिती मिळाली आहे परंतु जे कोणी नागरिक बाहेरून येत असतील त्यांनी आपली माहिती प्रशासकीय यंत्रणेला देऊन सहकार्य करा तसेच रोहा बाजारपेठेत नागरिकांनी एकच गर्दी करू नका आत्यावशक असेल तरच घराबाहेर पडा कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला मोलाचे सहकार्य करा असे आवाहन सा.रोहा टाइम्स व टीव्ही सेव्हन मराठी या वृत्तवाहिनीने केले आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close