टपऱ्या हटविल्याने शेकडो व्यावसायिकांचा रोजगार थांबला.

[avatar]

मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण चे काम वेगाने सुरू असल्याने तीन जिल्ह्यांच्या टोका वर वसलेला पोलादपूर चे स्वरूप बदलत आहे पोलादपूर तालुका दुर्गम असल्याने येथे महामार्गालगत छोटी मोठी दुकाने थाटून नागरिक आपला व्यवसाय करत होते परंतु चौपदरीकरण कामामध्ये पोलादपूर स्थानक च्या लगत असलेले शेकडो व्यवसायिक बाधित झाले  असल्याने स्थानक परिसर ओसाड भासत आहे त्यातच पोलादपूर विद्यामंदिर कडे जाणार रस्ता सह चढ काढण्यात आल्याने या ठिकाणचे रूप बदलले पहावयास मिळत आहे गेली काही वर्षांपूर्वी पासून असलेली टपरी, अनेक लहान हॉटेल बाधित झाल्याने त्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून त्याचा रोजगार थांबला असल्याचे वास्तव समोर आले आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम सध्या कशेडी ते इंदापूर वेगाने सुरू असले तरी पोलादपूर शहरात चौपदरीकरणाचे काम पावसाळ्यानंतर सुरू करण्यात आलेला आहे.पोलादपूर शहरात रस्त्यालगत शेकडो पेक्षा जास्त व्यावसायिक आणि लहान- सहान विक्रेते आपला व्यवसाय दुकान चालवून आपले कुटुंब चालवत होते.गेल्या काही  दिवसांपासून महामार्गाचे काम पोलादपूरात आले असून काम साठी जागा मोकळी करण्यात येत असून शेकडो व्यावसायिकांना व टपरी धारकांना तेथून हटवून वाऱ्यावर सोडण्यात आले आहे त्यामुळे शेकडो कुटुंब रोजगार नसल्याने हतबल झालेले आहेत.बसस्थानक परिसरात तसेच महामार्गालगत गेल्या अनेक वर्षांपासून विविध व्यवसाय दुकान थाटून शेकडो नागरिक आपले कुटुंब चालवत होते परंतु सध्या चौपदरीकरणाच्या कामामुळे टपऱ्या हटविल्याने व पर्यायी रोजगार नसल्याने तसेच शासनाने कोणतीही मदतीची तरतुद न केल्याने या व्यावसायिक व टपरी धारकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. पोलादपूर बसस्थानकात परिसर म्हणजे मुंबई कोकण महाबळेश्वर कडे जाणाऱ्या प्रवाशांची  येथे वर्दळ असते. तसेच तालुक्यातील महत्वाचे वर्दळीचे ठिकाण शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची येथून वर्दळ असते. त्यामुळे पोलादपूर बसस्थानकात परिसर नेहमीच गजबजून राहत आलेला आहे.त्यामुळे महामार्गालगत बसस्थानक परिसरात दुतर्फा छोटेमोठे टपरी व्यावसायिक व इतर व्यावसायिक आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून परिवाराची उपजीविका करत होते परंतु चौपदरीकरणाच्या कामामध्ये हा परिसर पूर्ण उजाड झाला आहे या परिसरात असणारे शेकडो व्यावसायिकांना त्याचा व्यवसाय गुंडाळावा लागला आहे.त्यातच सद्य स्थितीत येथील काम ठप्प पडल्याने टपऱ्या व व्यावसायिक गाळे हलविण्याचा घाई केल्याचा आरोप व्यवसायिक धारका कडून करण्यात येत आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close