मी माफी मागणार नाही, राहुल गांधी.
[avatar]
नवी दिल्ली । काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपण माफी मागणार नसल्याचं सांगितलं आहे. रेप इन इंडिया वक्तव्यावरुन राहुल गांधी यांच्यावर टीका करत भाजपा खासदारांनी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी करत सभागृहात गदारोळ घातला. यावर बोलताना राहुल गांधी यांनी आपण कधीही त्यांची माफी मागणार नाही असं स्पष्ट केलं आहे. महत्वाच्या मुद्द्यावरुन लक्ष हटवण्यासाठी माझ्यावर आरोप केले जात आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला.