रायगड ब्रेकिंग न्यूज!!!बेधुंद ड्रायव्हरने आठ जणांना उडवले ,तीन जागीच ठार ,एक अत्यवस्थ…

[avatar]

रायगड ब्रेकिंग न्यूज!!!बेधुंद ड्रायव्हरने आठ जणांना उडवले ,तीन जागीच ठार ,एक अत्यवस्थ…

चणेरा( वार्ताहर ) रेवदंडा येथील जे एस डब्लू येथून रोहा बाजूकडे येणाऱ्या ट्रकच्या चालकाने बेधुंदपणे गाडी चालवत रेवदंडा ते चणेरा पर्यंत आठ लोकांना उडवले असून त्यातील तीन जण जागीच ठार झाले असून एक महिला अत्यवस्थ आहे.प्राथमिक माहितीनुसार चार जण जखमी आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रेवदंडा बाजूकडून एम एच ०४ ई वाय ८५०१ या गाडीच्या चालकाने बेधुंदपणे गाडी चालवत साळाव ,आमली येथे प्रत्येकी एक व्यक्तींना तर चेहेर येथे दोन व्यक्तींना ठोकर मारून जखमी केले.त्यानंतर भरधाव वेगाने गाडी रोहा बाजूकडे चालवत नेली.पुढील गावात सदर घटनेची खबर मिळताच स्थानिकांनी सदर ट्रक अडविण्यासाठी प्रयत्न केला असता त्याने अनेक गाड्या व अडथळे उडवून लावत भरधाव वेगाने ट्रक चालवत न्हावे फाटा नजीक एका जोडप्याला व त्यांच्या लहानग्या मुलाला उडवले.यामध्ये जिप शाळा शिक्षक लक्ष्मण ढेबे व त्यांचा मुलगा जागीच ठार झाला असून त्यांच्या पत्नीचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत.सदर धडक इतकी जोरात होती की संबंधित शिक्षकांच्या गाडीचा चक्काचूर झाला असून गाडी सुमारे चारशे मिटर फरफटत गेली आहे.त्यानंतर सदर चालकाने सारसोली गावाच्या पुढे चणेरा येथील नागरिक उदय वाकडे याला ठोकरल्याने सदर व्यक्ती देखील जागीच मृत झाली आहे.भरधाव वेगाने ट्रक चालवणाऱ्या या चालकाला चांडगाव नजीक स्थानिक युवकांनी धाडसाने पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे.
सदर घटनेचे वृत्त समजताच स्थानिक उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पो .नि नामदेव बंडगर यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.या घटनेमुळे स्थानिक जनतेमध्ये मोठा प्रक्षोभ आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close