शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलित अन्नदान.

[avatar]

रायगड ।  राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार याच्या 80 व्या वाढदिवस सगळीकडे साजरा होत असताना आज खोपोली शहरात राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मसुरकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील गोरगरीब कुटूंबाना अन्नदान करण्यात आले. तर दररोज मॉर्निग वॉक करणाऱ्या नागरिकांना पेढे व गुलाबाचे फुल देण्यात आले.

खोपोलीतील लोहाना समाज हॉलमध्ये झोपडपट्टी व गोरगरीब नागरिकांना स्वादिष्ट जेवणाची सोय करण्यात आली. तर पक्ष कार्यालयात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मसुरकर, नगराध्यक्षा सुमन औसारमल ,नगरसेवक मोहन औसारमल, जेष्ठ नेते उल्हासराव देशमुख, नगरसेवक मणेश यादव, युवक अध्यक्ष अतुल पाटील, आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close