रोहा तालुक्यातील ऐनवहाळ ३ तर भालगाव २ जण कोरोना पॉझिटिव्ह.तालुक्यात खळबळ…
[avatar]
रोहा तालुक्यातील ऐनवहाळ ३ तर भालगाव २ जण कोरोना पॉझिटिव्ह.तालुक्यात खळबळ….
रोहा (विशेषप्रतिनिधी) रायगड जिल्ह्यात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले. रोज कोरोना बाधितांचा आकड़ा वाढता आहे. रोहा
तालुक्यात आता कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे रोहा शहर, ग्रामीणातील नागरिक निर्धास्त होते. कोलाड, नागोठणे, चणेरा घोसाळे भागात लोक रस्त्यावर सर्रास फिरत होते. शुक्रवारी म्हसळ्यात कोरोनाचा रुग्ण आढळला.कोलाड विभागातील ऐनवहाळ गावातील तीन, घोसाळे विभागातील भालगांव गावातील दोघांचे मेडिकल रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात कोरोनाने सुरू वात झाली. अखेर कोरोनाने रोह्यला विळखा घातल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. तर ऐनवहाळ गावात तीन रुग्ण, भालगांव गावात दोघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, त्या सर्व रुग्णांवर अलिबाग येथिल जिजामाता रुग्णालयात उपचार सुरु आहे, रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहीती रोहे तहसिलदार कविता जाधव सा.रोहा टाइम्सला दिली.
ऐनवहाळ गावात भांडुप मुंबई मधून १७ मे रोजी आलेल्या तिघांना कोरोनाची लागण झाली. त्यांना कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याने स्वबचे नमूने जे जे रुग्णालयात मुंबई येथे पाठवण्यात आले होते. त्या रुग्णांचे रिपोर्ट शुक्रवारी रात्रों पॉझिटिव्ह आले. त्या रुग्णांना उपचारार्थ अलिबाग येथे हलविण्यात आले. त्यात महिला ६५ वर्षे, पुरुष ४८, तरुण २६ असा समावेश आहे. दुसरीकडे घोसाळे विभागातील भालगांव गावातील कुटुंबातील दोघेजण लालबाग मुंबईतून १४ मे रोजी गावी आले. मजल दरमजल करीत रोहयातून एका खाजगी मॅजिक गाडीने भालगांव येथे गेले. त्यांच्यातही लक्षणे आढळल्याचे समजताच स्थानिक प्रशासनाने स्वब नमुने तपासणीसाठी पाठविले. यातील पुरुष स्री वय अंदाजे 50 असे आहे, संपर्कात आलेल्या लोकांना सतर्क करण्यात आले. दोन्ही गावांच्या सीमा बंद करून खबरदारीच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात येतील अशी अधिक माहीती रोहे तहसीलदार कविता जाधव यांनी रोहा टाइम्स ला दिली आहे.