पोलिसांनो सावधान….वाहनचालकांकडून पैसे घ्याल, तर खंडणीचा गुन्हा होणार दाखल….पुणे पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय….

[avatar]

पोलिसांनो सावधान….वाहनचालकांकडून पैसे घ्याल, तर खंडणीचा गुन्हा होणार दाखल….पुणे पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय….

पुणे(विशेष प्रतिनिधी)पोलिसांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. आता पोलिसांवर खंडणीचा गुन्हा दाखल होणार आहे. कारण नागिकांकडून लाच किंवा चिरीमिरी घेताना आढळल्यास पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.यापुढे जर नागरिकांकडून पैसे घेताना वाहतूक पोलीस आढळून आले तर त्यांच्यावर थेट खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.यासाठी काही कर्मचाऱ्यांची नेमणूक देखील करण्यात आली आहे. पोलिसांवर वचक ठेवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे पाऊल उचललं आहे.

पुण्यात गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठी फक्त गुन्हेगारच नाही, तर पोलिसांवर देखील अंकुश बसवला जाणार आहे. जर पोलिसांनी आता नागरिकांकडून विनाकारण पैसे घेतले, तर आता पोलिसांवरच पुण्यात खंडणीचा गुन्हा दाखल होणार आहे. नागरिकांकडून जर विनाकारण पैसे घेताना आढळून आल्यास पोलिसांवर कारवाई होणार असल्याची माहिती मिळत आहे.

वाहनचालकांची अडवणूक करून त्यांच्याकडून चिरीमिरी उकळणाऱ्या वाहतूक पोलिसांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी इशारा दिला आहे. यापुढे जर नागरिकांकडून पैसे घेताना वाहतूक पोलीस आढळून आले, तर त्यांच्यावर थेट खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. या कारवाईकरिता काही कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याची देखील माहिती समोर आली आहे. कारण यापूर्वी वाहतूक पोलीस नागरिकांकडून पैसे घेत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले होते. त्यानंतर अनेक पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात आली होती. परंतु आता थेट अशा कर्मचाऱ्यांवर वचक बसविण्यासाठी पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.

हे पोलीस कर्मचारी साध्या नागरी वेशामध्ये वाहन चालक म्हणून शहराच्या विविध भागात फिरणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे. वाहतूक पोलीस नागरिकांवर कारवाई करताना चिरीमिरी घेतात का? त्यांच्याकडे पैशांची मागणी करतात का? याची या पथकाकडून पाहणी केली जाणार आहे. एखादा पोलीस कर्मचारी असा गैर प्रकार करताना आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

पुणे शहरामधील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनलेली आहे. वाहतूक पोलिसांवर अनेकदा टीका देखील केली जाते. वाहतूक कोंडी होत असताना अनेकदा वाहतूक पोलीस कर्मचारी गाड्या उचलण्यामध्ये किंवा वाहन चालकांना अडवून त्यांच्याकडून दंड वसुली करण्यामध्ये मग्न असल्याचे दिसतात. अनेकदा चौकात आणि रस्त्यांवर उभे राहण्याऐवजी वाहतूक पोलीस आडबाजूला छुप्या पद्धतीने उभे राहतात. चार-पाच जणांच्या गठ्ठयाने एकदम वाहन चालकांच्या अंगावर जातात आणि त्यांच्यावर वेगवेगळ्या कलमाखाली दंडात्मक कारवाई करायला सुरुवात करतात. घाबरलेल्या वाहन चालकांकडून मोठ्या दंडाची रक्कम ऐकून त्यांच्याकडे विनवणी सुरू केली जाते.त्यावेळी वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांकडे पैशांची मागणी केली जाते. चिरीमिरी घेऊन वाहन चालकांना सोडून दिले जाते. अनेकदा असेही प्रसंग घडतात की चालककडून पैसे घेतलेत आणि त्याच्यावर दंड ही आकारण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांकडून अशा प्रकारे चिरीमिरी घेण्याचे अनेक व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झालेले आहेत. या घटनांची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close