नागोठण्यात मध्यरात्री भीषण आग ; हॉटेल कल्पनासह तीन दुकाने भस्मस्थानी…सहा ते सात दुकानांचे प्रचंड नुकसान; सहा तासानंतर आगीवर नियंत्रण…… 

[avatar]

नागोठण्यात मध्यरात्री भीषण आग ; हॉटेल कल्पनासह तीन दुकाने भस्मस्थानी…सहा ते सात दुकानांचे प्रचंड नुकसान; सहा तासानंतर आगीवर नियंत्रण……

नागोठणे(महेंद्र माने) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एस.टी. स्थानकासमोरील म्हात्रे बिल्डिंग मधील दुकानांना सोमवार 10 जून रोजी मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या दरम्यान भीषण आग लागली. या आगीत हॉटेल कल्पनासह तीन दुकाने जळून खाक झाली असून एकुण सहा ते सात दुकानांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाला पाच ते सहा तासांच्या अथंग प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

सोमवार 11 मे रोजी मध्यरात्री साधारण 1.30 वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एस.टी. स्थानकासमोरील म्हात्रे बिल्डिंग मधील दुकानांना लागलेली आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे प्राथमिक अंदाज असून यामध्ये हॉटेल कल्पना,के जी एन फुट वेअर,जाखमाता क्लॉथ सेंटर ही तीन दुकानाने जळून खाक झाली असून सर्वांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्या दुकानांना लागून असलेले वाघ मेडिकल,किराणा स्टोअरसह तीन ते चार दुकानांही आगीची झळ लागली. आगीचे वृत्त समजतात रिलायन्स,सुप्रीम कंपनीचे तसेच रोहा नगर पालिकेच्या अग्निशमन गाड्यांच्या सहाय्याने जवानांनी मोठ्या शर्थीने आग विजविण्याचा प्रयत्न केला असून त्यांना पाच ते सहा तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close