“मुंबई विद्यापीठाचा किल्ले रायगडावर स्वच्छ्ता अभियान….. 

[avatar]

“मुंबई विद्यापीठाचा किल्ले रायगडावर स्वच्छ्ता अभियान…..

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविंद्र कुळकर्णी सर यांच्या नियोजन व मार्गदर्शनाने मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास विभाग व श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्यिषेक सोहळ्यानंतर किल्ले रायगडवर स्वच्छता अभियान राबविण्यात आला.
रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर निर्माण होणाऱ्या किल्ले रायगडावरील कचऱ्याचे संकलन करणे तसेच कचऱ्याचे व्यवस्थापन करणे हा मुख्य उद्देश या अभियानाचा होता .
मुंबई विद्यापीठाच्या किल्ले रायगडावरील स्वच्छ्ता अभियानात मुंबई विद्यापीठाचे एकून ५० कर्मचारी व रायगड जिल्ह्यातील डी.जी.तटकरे महाविद्यालय माणगांव, सुंदरराव मोरे महाविद्यालय पोलादपूर, पिलाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रसायनी,जी. एम. वेदक विज्ञान महाविद्यालय तळा, डी.जी. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय तळा,जे.एस. एम महाविद्यालय अलिबाग, दोशी वकील महाविद्यालय गोरेगांव, शेठ जे.एन.पालीवाल महाविद्यालय पली,एम.बी.मोरे महिला महाविद्यालय धाटाव, को.ए.सो.डॉ. सी. डी.देशमुख महाविद्यालय रोहा,हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट चे महाविद्यालय महाड,डॉ.नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालय कोलाड,पीलाई इंजिनिअरिंग महाविद्यालय पनवेल,को.ए.सो.आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालय नागोठणे, वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालय मुरुड,
सी. के. टी महाविद्यालय पनवेल,
कोकण ज्ञानपीठ कला व वाणिज्य महाविद्यालय उरण , एम.एम. जगताप महाविद्यालय महाड या सर्व महाविद्यालयातील एकूण ४५० राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकार व स्वयंसेवक सहाभगी झाले होते.
किल्ले रायगडावरील स्वच्छ्ता अभियानात सहभागी झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकार, स्वयंसेवक,व मुंबई विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी रायगड किल्ल्यावरील हत्ती तलाव परिसर , गंगासागर तलाव परिसर, कुशावर्त तलाव परिसर, जगदीश्वर मंदिर परिसर, शिरकाई देवूळ परिसर, बाजारपेठेचा विस्तारित परिसर, रत्नशाळा परिसर ,नगारखाना परिसर, राजभवन सभोवतालचा परिसर, होळीच्या माळाचा विस्तारित परिसर आदी परिसराची स्व्छता वेगवेगळ्या प्रकारच्या कचरा संकलनाचे केली.व संकलीत केलेला कचरा एकत्रीत करुन पुढील प्रक्रियेसाठी दिला.
रायगडावरील स्वच्छ्ता अभियानात सहभागी झालेल्या टीमला मुंबई विद्यापीठाचे
प्र- कुलगुरू प्राचार्य डॉ.अजय भामरे सर यांनी सदिच्छा भेट देवून किल्ले रायगडावरील स्वच्छ्ता अभियानाची पाहाणी केली व स्वच्छ्ता अभियान यशस्वीपणे राबविल्या बदल विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.सुनील पाटील, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष कार्य अधिकारी प्रा.सुशील शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे रायगड जिल्हा समन्वयक प्रा. तुळशिदास मोकल, विभागीय समन्वयक डॉ.दिवाकर कदम, डॉ.दत्ता हिंगमिरे ,रायगड जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकार व सहाभागी टीमचे कौतुक केले.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close