मुरुडमध्ये वीजांच्या कडकडाटासह आतापर्यंत १८० मि.मि.पाऊस : पहिल्या पावसात बोर्ली रस्त्यावर तळे साचले…..

[avatar]

मुरुडमध्ये वीजांच्या कडकडाटासह आतापर्यंत १८० मि.मि.पाऊस : पहिल्या पावसात बोर्ली रस्त्यावर तळे साचले…..

कोर्लई(राजीव नेवासेकर) मुरुडमध्ये काल रात्री वीजांच्या कडकडाटासह १५४मि.मि.पाऊस पडला तर आतापर्यंत एकुण १८० मि.मि.पावसाची नोंद झाली आहे.बोर्ली -मांडला परीसरात रात्री चार तास जोरदार पडलेल्या पावसामुळे बोर्ली गावात जाणाऱ्या रस्त्यावर अक्षरशः तळे साचल्याने वाहनचालकांना व दैनंदिन जा-ये करणा-यांना याचा त्रास सहन करावा लागला.राज्यात मान्सून सक्रिय झाला असून पावसाने दमदार हजेरी लावली आहे.हवामान खात्याने रायगड, सोलापूर, धाराशी जिल्ह्यांतील काही ठिकाणी तुरळक ठिकाणी गडगडाटी वादळासह विजांच्या कडकडाटासह आणि ताशी 40-50 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला असून बीड आणि लातूर पुढील ३-४ तासात. घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी.असे कळविण्यात आले आहे.मुरुड शहरासह तालुक्यात काल रात्री नऊ नंतर वीजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.शहरातील व तालुक्यातील काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला.जवळजवळ चार तास जोरदार पडलेल्या पावसामुळे काही ठिकाणी पाणी तुंबले होते तर बोर्ली स्टॅण्ड दरम्यान रस्त्यावर यंदा कॉंक्रिटिकरण करण्यात आले.स्टॅंडपासून गावात जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचल्याने अक्षरशः तळे साचल्याने वाहनचालकांना व दैनंदिन जा-ये करणा-यांना याचा त्रास सहन करावा लागला.सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या ठिकाणी रस्त्यालगत मो-याचे सुरु असलेले काम पावसाळ्यापूर्वी पुर्ण न झाल्याने याचा देखील त्रास येथील स्थानिक व वाहनचालकांना सहन करावा लागणार असल्याचे बोलले जात आहे.पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला असून शेतीच्या कामासाठी लगबग सुरू झाली आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close