रोहा तालुक्यातील भुवनेश्वर पाणी योजनेच्या प्रस्तावाला वनविभागाची परवानगी…मधुकर पाटील यांनी मानले आभार…… 

[avatar]

रोहा तालुक्यातील भुवनेश्वर पाणी योजनेच्या प्रस्तावाला वनविभागाची परवानगी…मधुकर पाटील यांनी मानले आभार……

रोहा(संतोष सातपुते)रोहा तालुक्यातील वरसे हद्दीतील येथील भुवनेश्वर येथे २०२३ साली जल जिवन मिशन अंतर्गत सुमारे साडेतीन कोटी रुपये योजना चालू होती . परंतु काही तांत्रिक कारणांमुळे वनविभागाची परवानगी साठी अडचण होती. परंतु ग्रामस्थांची पाण्यासाठी प्रखर मागणी लक्षात घेऊन व शासकीय अडचणी दुर करुन पिण्याच्या पाण्याची सुविधा करिता सोमवारी दि. (१०) रोजी अखेर उप वनसंरक्षक अप्पासाहेब निकत यांनी परवानगी दिली आहे. त्याबद्दल वरसे ग्रामपंचायतीमध्ये सर्वेसर्वा मधुकर शेट पाटिल यांनी ग्रामस्थांच्या वतीने जाहिर आभार वनखात्याचे मानले.

दरम्यान गेल्या वर्षी पासून सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च करून जल जीवन पाणी योजनेमुळे नागरिकांची तहान भागनार होती. परंतु माञ वनखात्याने परवानगी नाकारल्याने पुढील काम रखडलेले होते. मोदीजी च्या संकल्पनेतून हर घर हर नल या योजनेसाठी गाव ठिकाणी वनखात्याने कोणतीही अडचण करु नये असा नियम असता भुवनेश्वर येथील योजनेत परवानगी नाकारण्यात वन खात्याला रस आहे का ? असा सवाल राष्ट्रवादी चे मधुकर पाटील यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे जर येत्या दोन दिवसांत वनविभागाने योजनेला परवानगी दिली नाही तर महिलांचा हंडा मोर्चा वनविभागावर काढु असा इशारा मधुकर पाटिल यांनी देताच तात्काळ वनविभागाने तत्परतेने परवानगी दिली. सदर या परवानगीमुळे वरसे येथील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.

कोट- भुवनेश्वर येथील जल जिवन मिशन योजनेत काही शासकीय अडचणी होत्या त्यात लगेच लोकसभा निवडणूक लागल्याने आचार संहिता लागू झाल्या होत्या मात्र आता या योजनेला वनविभागाने परवानगी दिली आहे.

उप वनसंरक्षक अप्पासाहेब निकत ,रोहा

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close