साळाव -मुरुड रस्त्याची कामे अर्धवट करणा-या ठेकेदारांची बीले देऊ नका अन्यथा आमरण उपोषण करणार : अरविंद गायकर….मुरुडच्या पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळातर्फे उपअभियंता यांना निवेदन….. 

[avatar]

साळाव -मुरुड रस्त्याची कामे अर्धवट करणा-या ठेकेदारांची बीले देऊ नका अन्यथा आमरण उपोषण करणार : अरविंद गायकर….मुरुडच्या पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळातर्फे उपअभियंता यांना निवेदन…..

कोर्लई(राजीव नेवासेकर)साळाव -मुरुड रस्त्याची अर्धवट कामे करणाऱ्या ठेकेदारांची रस्त्याच्या कामाचा खुलासा होईपर्यंत बीले देऊ नका.अन्यथा नाईलाजास्तव आम्हाला याविरोधात आमरण उपोषण करावे लागेल.असा इशारा पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळातर्फे तालुका अध्यक्ष अरविंद गायकर व सचिव शैलेश वारेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.यावेळी कनिष्ठ लिपिक दर्शन मिठाग्री यांनी निवेदन स्वीकारले.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि अलिबाग -मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी साळाव ते आगरदांडा रस्त्याच्या कामासाठी सत्तावीस कोटी पन्नास लाख इतका भरघोस निधी देवून सुध्दा इतर भागातील रस्ते चांगले झाले आहेत पण मुरूड ते मजगाव रस्त्याची परिस्थिती बिकट आहे. जवळपास नबाबाचा राजवाडा (पॅलेस) ते पेट्रोल पंप ठिकाणी काम अर्धवट अवस्थेत आहे. एका साईडला रस्ता बनविलेला आहे डांबरीकरण त्याच्या बाजूच्या साईटला तसेच्या तसेच आहे. याचा अर्थ काय समजायचा ? तसेच नांदगाव ने सर्वांदांडा या गावातील रस्ता सुध्दा मुरुड ते मजगाव या रस्त्याची जर आपण पाहणी केली मला वाटत नाही तो पावसाळ्यात टिकेल, कारण त्याचा जी लेहर आहे तो निकृष्ट दर्जाचा आहे एवढा भरघोस निधी आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी देऊन सुद्धा अधिकारी म्हणून आपली जबाबदारी की या भागातला रस्ता चांगल्या पध्दतीने व्हावा पण तसे न होता याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. पावसाळ्यामध्ये जर या रस्त्याची दुरावस्था झाली तर याला जबाबदार कोण?असा सवाल उपस्थित केला जात आहे.
याबाबत आपणाकडून खुलासा देण्यात यावा आणि जे कोणी ठेकेदार आहेत प्रथमता त्यांची बिले अदा करण्यात येऊ नयेत तसेच मच्छीमार्केट ते एकदरा पूल रस्त्याची दुरावस्था तशीच आहे.येथील जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न लक्षात घेऊन आठ दिवसांत आम्हाला खुलासा देण्यात यावा.अन्यथा याविरोधात आम्हाला नाईलाजास्तव आमरण करावे लागेल व मग याची सर्वस्वी जबाबदारी अधिकारी म्हणून आपली असेल.असे पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळातर्फे तालुका अध्यक्ष अरविंद गायकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले असून सदर निवेदनाच्या प्रती अलिबाग -मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ दळवी व मुरुड पोलिस ठाण्यात देण्यात आल्या आहेत.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close