रोहा भाजपा कडून मोदींच्या शपथविधी नंतर रोहा शहरात जल्लोष आनंदोत्सव साजरा……. 

[avatar]

रोहा भाजपा कडून मोदींच्या शपथविधी नंतर रोहा शहरात जल्लोष आनंदोत्सव साजरा…….

रोहा(संतोष सातपुते) मा. श्री नरेंद्रजी मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे मोदी हे दुसरे व्यक्ती ठरले.देशभरात उत्साहाचे वातावरण व जल्लोष साजरा होतं असताना रोहातील ऐतिहासिक श्री राम मारुती चौक येथे भारतीय जनता पार्टीकडुन स्क्रीन वर शपथविधी सोहळा याची देही, याची डोळा पाहण्याचे असे उत्तम नियोजन करण्यात आले होते. तसेच रोहे शहराच्या प्रमुख भागातून श्री राम मारुती चौक, बाजारपेठ, तीनबत्ती नाका, नगरपालिका चौक येथुन दुकानदारास तसेच ये जा करणाऱ्या प्रत्येक नागरिकास बुंदी, पेढे वाटप करून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पनेला भारतीय मतदारांनी तसेच रोहा तालुक्यातील मतदारांनी मतदान केल्याबद्दल सुद्धा भारतीय जनता पार्टी रोहा च्या वतीने नागरिकांचे धन्यवाद मानले.या आनंदाच्या कार्यक्रमास रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग तसेच युवामोर्चा जिल्हा सरचिटणीस रोशन चाफेकर, सुमित रिसबूड,रोहा शहर अध्यक्ष यज्ञेश भांड, ज्येष्ठ नेते सनल कुमार, दक्षिण रायगड चिटणीस श्रद्धा घाग,महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस जयश्री भांड, ज्येष्ठ कार्यकर्ते विनायकजी बेडेकर, वसंत शेलार,सोशल मीडिया जिल्हा संयोजक सनील इंगवले, सागर ओक, सीमा कोनकर मॅडम,संस्कृती ओक,दक्षिण रायगड युवा वॉरिअर संयोजक वैभव कुलकर्णी,दादा कुळकर्णी, रोहा तालुका महिला मोर्चा सरचिटणीस रिया कासार, सौ. ज्योती सनलकुमार, राकेश चाफेकर, अनिल घरजाळे, निखिल बोरोले दिनकर खरविले आदी समस्त रोहेकर उपस्थित राहून आनंद उत्सव साजरा केला.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close