ग्रुप ग्रामपंचायत वरसे भुवनेश्वर मधील जलजीवन मिशन योजनेचा अडथळा ठरतंय रोहा वनविभाग – जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांच्या थेट आरोप…… 

[avatar]

ग्रुप ग्रामपंचायत वरसे भुवनेश्वर मधील जलजीवन मिशन योजनेचा अडथळा ठरतंय रोहा वनविभाग – जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांच्या थेट आरोप……

रोहा(दीप वायडेकर) अन्न, वस्त्र, निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरज आहेत. या मूलभूत गरजांमध्ये पाणी हे माणसाच्या आयुष्यातील एक अत्यावश्यक आणि अविभाज्य घटक आहे. ही गरज लक्षात घेता केंद्र सरकारने 2018- 19 च्या अर्थसंकल्पात जल जीवन मिशन योजना ,हर घर जल या योजनेची तरतूद केली.

या योजनेचा संपूर्ण देशासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फायदा झालेला पाहायला मिळाला, रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वरसे ला या योजनेकरिता तब्बल साडेसहा कोटीचा निधी मिळाला. तर फक्त भुवनेश्वर गावाला साडेतीन कोटीचा निधी मिळाला.या कामाची वर्क ऑर्डर 2023 ला मिळाली. ही वर्क ऑर्डर मिळून सुद्धा अजूनही कामाला सुरुवात झाले नाही. यामुळे ग्रामपंचायत मध्ये पाण्याचा तुटवडा निर्माण होऊन, पाण्यासाठी बोंबाबोंब सुरू झाली. संबंधित योजना गावात यशस्वी रित्या पूर्ण व्हावी याकरिता ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच अमित मोहिते ,उपसरपंच शांतीशिल तांबे, सदस्य गणेश शिवलकर तसेच उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र नाकती हे आथीक परिश्रम घेत होते. त्यांनी शेवटी ही समस्या घेऊन रोहा पंचक्रोशी चे सर्वेसर्वा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांची ही समस्या सोडवण्यासाठी भेट घेतली,त्यांनी याबद्दल ठेकेदाराशी चौकशी केली असता.

त्यांनी रोहा वन विभाग याला अडथळा ठरत आहे असे ठोस कारण दिले. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील हे संतप्त होऊन थेट वन विभाग कार्यालय अधिकाऱ्यांनी जर पुढील दोन दिवसात या कामाची परवानगी मिळाली दिली नाही तर महिला मोर्चा घेऊन वनविभाग कार्यालयावर धडकू. असा थेट इशारा दिला आहे.
जिल्ह्याचे मुख्यअधिकारी, आमदार ,मंत्री, खासदार यांनी या गंभीर विषयावर फोन करून आदेश देऊन सुद्धा वनविभाग या गंभीर समस्या कडे का गांभीर्याने लक्ष देत नाही? असा संतप्त सवाल नागरिकांमधून होत आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close