रोह्यात पावसाची दमदार एन्ट्री मुंबई गोवा महामार्गावर कोलाड नाक्यावर तुंबून रस्त्यावर साचले पाणी, चिखळमय प्रवास सुरू……. 

[avatar]

रोह्यात पावसाची दमदार एन्ट्री मुंबई गोवा महामार्गावर कोलाड नाक्यावर तुंबून रस्त्यावर साचले पाणी, चिखळमय प्रवास सुरू…….

कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यात पावसाची दमदार सुरूवात त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर कोलाड आंबेवाडी नाक्यावर भर चौकात तसेच सर्व्हिस रोडचे काम निकृष्ट दर्जाचे त्यात आता उड्डाण पुलाचे काम सुरू केल्याने काही ठिकाणी खोदाई केलेले मातीचे ढिगारे आहेत त्यात भले मोठे पडलेल्या खड्ड्यात तुंबून साचले पाणी वाहतुकीस ठरत आहे अडथळा चालकांना करावी लागते तारेवरची कसरत तर चिखलमय रस्ता झाल्यामुळे रिक्षा चालक दुचाकी वाहन तसेच पादचारी नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

शनिवारी दुपारी तसेच मध्यरात्री पावसाने दमदार एन्ट्री केली तर सुमारे चार ते पाच तास पाऊस पडल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.यामुळे मुंबई गोवा हायवे मेन मार्गावरील कोलाड आंबेवाडी नाक्यावरील रस्त्यावर पाणीच पाणी साचले. पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी पाणीच तुंबल्याने अनेकांची तारांबळ उडाली तर लोकांना त्या पाण्यातूनच मार्ग काढाव लागला.

मुंबई-गोवा हायवेवरील चौपदरीकरणाच्या कामाला १६ वर्षे पुर्ण झाली असुन या कामात कोणतेही प्रगती नाही.प्रशासनाचा बेजबाबदारपणा व ठेकेदारांचा मनमानी कारभार यामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले असल्याचे चित्र दिसून येत आहे परंतु या कामासाठी लागणारी जागा उपलब्ध करण्यासाठी येथील किराणा मालाचे व्यापारी,हॉटेल,पान टपरी,कापड व्यावसायिक, तसेच इतर व्यावसायिक यांना कोणतेही सवड न देता त्याच्या दुकानावर बुलडोजर फिरावण्यात आला.काही दुकानातील सामान ही काढून दिला नाही याला तब्बल बारा तेरा वर्ष उलटून गेली तरी देखील काम पूर्णत्वावर नाही तर या उलट तब्बल एवढ्या वर्षानंतर या ठिकाणी उशिराने उड्डाण पुलाचे काम सुरू केल्याने ऐन पावसाळ्यात आता मार्गाच्या दोन्ही कडेचे सर्व्हिस रोड देखील वाहतुकीमुळे अधिक खड्डेमय झालेचे दिसून येत आहे तर पावसामुळे खड्ड्यात पाणी साचल्याने ते घानरडे पाणी पादचारी नागरिकांच्या अंगावर उडून त्याचा जलाभिषेक होत आहे.

मुंबई गोवा मेन मार्ग तसेच कोलाड आंबेवाडी नाका चौक हे बाजारपेठेचे मध्यस्थी ठिकाण असुन येथून मुंबई गोवा तसेच पुणे,रोहा,मुरुड,अलिबाग कडे जाण्यासाठी प्रचंड मोठया प्रमाणात वाहतूक सुरु असते ही वाहतूक सर्व्हिस रोडवरून सुरु केल्यानंतर हा रस्ता पूर्णपणे खचला आहे तर काही ठिकाणी रस्त्याची डांबर निघून गेल्यामुळे रस्त्याचे खडे वर आल्यामुळे या रस्त्यावरुन टुव्हीलर गाड्या स्लिप होत आहेत. यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.याला कारण निद्रअवस्थेत असलेला प्रशासन व प्रशासनाचा ठेकेदारावर नसलेला वचक यामुळे शासनाच्या तिजोरीतील करोडो रुपये वाया गेले तरी रस्त्याचे काम पुर्ण होत नाही परंतु खचलेल्या व निकृष्ट झालेल्या रस्त्यामुळे कोणाचा नाहक बळी गेला तर याला जबाबदार कोण अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातुन व्यक्त केली जात आहे.

तर सुरुवातीच्या हलक्या स्वरूपाच्या पावसात कोलाड आंबेवाडी नाक्यावर ही अवस्था आहे तर पुढे अधिक पडणाऱ्या मुसळधार पावसात काय अवस्था पाहवयास मिळेल हे पाहावे लागत आहे तसेच सर्व्हिस रोडवर जागो जागी पाणी साचत असल्याने प्रवासी एस बस नक्की नक्की कुठे थांबते यासाठीच प्रवाशी वर्गाची धावपळ सुरू होत असून दरम्यान कोलाड खांब प्रवासी रिक्षा चालकांचे देखील रिक्षा उभी करण्यासाठी या रस्त्याच्या कामामुळे मोठी कुचंबणा होत असल्याने त्याही प्रवाशी वर्गाची मोठी हेळसांड होत असताना दिसत आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close