रोहा-मुरुड रस्त्याची दयनीय अवस्था सार्वजनीक बांधकाम खाते निद्रीस्त-रस्ता सुरक्षा प्रश्र ऐरणीवर……..

[avatar]

रोहा-मुरुड रस्त्याची दयनीय अवस्था सार्वजनीक बांधकाम खाते निद्रीस्त-रस्ता सुरक्षा प्रश्र ऐरणीवर……..
तळा(किशोर पितळे)रोहा तांबडी मार्गे मुरूड रस्त्यांची उसर ते रोहा रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून मोठी दुर्घटना घडल्यावरच निद्रिस्त प्रशासनाला जाग येईल का?असा सवाल मार्गावरीलप्रवासी,वाहनचालक
करीत आहेत.यामार्गावरुन अनेक पर्यटकपर्यटनस्थळी पर्यटनस्थळी मुरुड येथे जात असतात.वाहनाची सतत वर्दळ चालू आहे.रोहा खारी काजुवाडी पुढील रस्ता झाला असून अर्धवट काम केले आहे साईट पट्टी खड्डे फुटभर खचलेली आहे. उसर ते रोहा रस्त्याची दयनीय अवस्था मृत्युचा सापळा होत आहे.रस्ता अरुंद असून खाच खळगे, दोन्ही साईटपट्टी फुटभर खचलेली, वळणा वरील झाडे झुडपे वाढलेली आहेत पर्यटकांनारस्त्याचा अंदाज येत नाही त्यामुळे सर्वच वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते वेळ प्रसंगी वादावादी होते.या मार्गावरून अधिभाराची वाहने ट्रॅक्टर,एस टी बस, खाजगी वाहने टेम्पो यामार्गाशिवाय पर्याय नाही.अशा समस्यांना वाहन चालकांना सामोरे जावे लागत आहे. या मार्गावरून रोहा मुरूड विभागाचे अनेक वेळा या खात्याचे अधीकारी,कर्मचारी ये-जा करीत असताना वास्तव का दिसत नाही.पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असून अनर्थ होण्यास वेळ लागणार नाही या रस्त्याच्या दयनीय अवस्थे कडे सार्वजनीक बांधकाम खाते जाणून बुजुन दुर्लक्ष केले जात असून मोठी दुर्घटना होण्याची वाट पहात आहे का?या गंभीर समस्यांकडे स्थानिक लोकप्रतीनिधी लक्ष देतील का? असा प्रती सवाल केला जात आहे.असा संतप्त सवाल होत असून रस्ता सुरक्षा प्रश्र ऐरणीवर आला असून लवकर दुरूस्ती करावी अशी मागणी केली जात आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close