माथेरानची महाराणी ८ जून पासून घेणार विश्रांती, मान्सून काळात नेरळ माथेरान मिनी ट्रेन सेवा राहणार बंद, मध्य रेल्वेची माहिती…… 

[avatar]

माथेरानची महाराणी ८ जून पासून घेणार विश्रांती, मान्सून काळात नेरळ माथेरान मिनी ट्रेन सेवा राहणार बंद, मध्य रेल्वेची माहिती……

कर्जत (गणेश पवार) पावसाळा तोंडावर आला आहे. तर पावसाळ्यात सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या माथेरान भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाकडून नेरळ माथेरान मार्गावर चालणारी मिनी ट्रेन सेवा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंद ठेवण्यात येते. या वर्षी सुट्ट्यांच्या हंगामात मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी माथेरानच्या महाराणीची सफर केल्यानंतर आता या शनिवारपासून माथेरानची महाराणी तब्बर चार महिन्यांच्या विश्रांतीसाठी जाणार आहे. याबाबत माहितीपत्र देत मध्य रेल्वेने याबाबत सूचित केलं आहे. या दरम्यान माथेरान अमनलॉज हि शटलसेवा मात्र सुरु राहणार आहे.

जगाच्या नकाशावर थंड हवेचे ठिकाण म्हणून अधोरेखित असलेल्या माथेरानमध्ये दरवर्षी लाखो पर्यटक सुट्यांच्या हंगामात येत असतात. माथेरानला पोहचण्यासाठी नेरळपासून दोनच मार्ग आहेत. पहिला रस्तेमार्ग व दुसरा रेल्वेमार्ग ! यामध्ये नेरळ माथेरान हि मिनी ट्रेन सेवा मध्यरेल्वेकडून चालवली जाते. देशातील विशेष रेल्वे सेवांमध्ये माथेरान रेल्वे सेवेचा समावेश होतो. समुद्रसपाटीपासून ८०० मीटर उंचावर सह्याद्रीच्या माथ्यावर वसलेल्या माथेरानमध्ये सुमारे ४००मिमी पाऊस पडतो. त्यामुळे २००५ साली अतिवृष्टी होऊन नेरळ माथेरान हि सेवा ठप्प झाली होती. मोठ्या प्रमाणात रेल्वे मार्गचे नुकसान झाल्याने हि सेवा सुरु होणारच नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र माथेरानची शान असलेल्या माथेरानच्या महाराणीसाठी पर्यटक व माथेरानकर आक्रमक झाले. तर मध्य रेल्वेकडून देखील अपार मेहनत घेऊन माथेरानच्या महाराणीची शीळ येथील दऱ्याखोऱ्यात पुन्हा एकदा घुमली होती. तेव्हा मान्सून काळात सुरक्षेचा उपाय म्हणून नेरळ माथेरान हि सेवा बंद ठेवण्यात येते. तेव्हा या ८ जून ते १५ ऑक्टोबर या कालावधीत हि सेवा मध्य रेल्वेकडून बंद करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे मध्यरेल्वेने दिली आहे. तर पर्यटकांना माथेरान मिनी ट्रेनच्या सफरीचा आनंद घेता यावा याकरिता अमनलॉज ते माथेरान अशी शटल सेवा मान्सूनमध्येही सुरु राहणार आहे. या शटलसेवेच्या नेहमीच्या ६ फेऱ्या तर शनिवार रविवारी दोन अधिकच्या विशेष फेऱ्या होणार आहेत. अशी माहिती मध्य रेल्वे परिचालन विभागाने दिली आहे.

अमन लॉज माथेरान शटल सेवेची वेळ

गाडी क्रमांक माथेरान अमन लॉज गाडी क्रमांक अमन लॉज माथेरान

५२१५४ ८.२० ८.३८ ५२१५३ ८.४५ ०९.०३
५२१५६ ९.१० ९.२८ ५२१५५ ९.३५ ९.५३
शनी/रवी spl-२ १०.०५ १०.२३ शनी/रवी spl-१ १०.३० १०.४८
५२१५८ ११.५ ११.३५ ५२१५७ १२.०० १२.१८
शनी/रवी spl -४ १३.१० १३.२८ शनी/रवी spl -३ १३.३५ १३.५३
५२१६० १४.०० १४.१८ ५२१५९ १४.२५ १४.४३
५२१६२ १५.१५ १५.३३ ५२१६१ १५.४० १५.५८
५२१६४ १७.२० १७.३८ ५२१६३ १७.४५ १८.०३

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close