जागतीक पर्यावरण दिनी रोहा सामाजिक वन विभागाकडून वृक्ष लागवड…… 

[avatar]

जागतीक पर्यावरण दिनी रोहा सामाजिक वन विभागाकडून वृक्ष लागवड……

कोलाड (श्याम लोखंडे ) 5 जुन 2024 रोजी जागतिक पर्यावरण दिन रोहा सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने विविध भागात वृक्ष लागवड करुन केला साजरा .

रोहा तालुक्यात जागतीक पर्यावरणाचे औचीत्य साधून 05 जून 2024 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण परिक्षेत्र रोहा यांचे कडुन रोहा एस.टी आगार परिसरात विविध प्रजातीची पॉलिथीन रोपे वृक्ष लागवड करुन जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमास मे. स्नेह वर्धीनी सामाजिक सेवाभावी संस्था वरसे ता. रोहा यांचे कडील फादर रुडी भाऊ, सिस्टर अलिना, रोलॅण्ड डिसोजा, लॉरेन्स डिसोजा यांनी सहकार्य देत सहभाग घेतला.
तसेच परिवहन मंडळाचे मोटर वाहन निरिक्षक पेण श्री.एम.एन. उचगावकर, ए.डी. तुपसमुर्दे, नंदन राऊत यांचे उपस्थितीत तसेच रा.प. रोहा आगारातील श्रीमती. सोफीया मुल्ला आगार व्यवस्थापक, ए.बी. रोहेकर स्थानक प्रमुख, ए.जी.पाटील,आर.डी. खानापुरकर, हेमंत कदम, विकास खाडे, संदिप गायकवाड इत्यादी कर्मचारी वृद तसेच सामाजिक वनीकरण परिक्षेत्र रोहा.ए.डी. पाटील वनक्षेत्रपाल, वाघे साहेब वनपाल रोहा, थळकर वनरक्षक रोहा, सुनिल लांगी, सुरेश वाघमारे, गोपिनाथ वाघमारे इत्यादी कर्मचारी वृंद यांनी उपस्थिती दर्शवित वृक्षांची लागवड केली.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close