स्वराज्य सह्याद्रीचा ग्रुप तर्फे शिव जयंती उत्सव व शिवज्योत मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी…… 

[avatar]

स्वराज्य सह्याद्रीचा ग्रुप तर्फे शिव जयंती उत्सव व शिवज्योत मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी……

माणगांव (सचिन पवार) माणगाव :”श्रीमंत योगी जगी एकची जाहला”, गडपती, गजश्वपती, भूपती प्रजापती, सुवर्णरत्नश्रीपती, अष्ठावधानजागृत,अष्ठप्रधानवेष्टीत,न्यायालयकांरमंडीत,सस्त्रास्त्रशतस्त्रपारगात,राजनीतीधुरधर प्रोढप्रतापपुरंदर, क्षत्रियकुलवतांश सिहासनाधिश्वर, महाराजाधिराज राजाशिवछत्रपती यांना मानाचा मुजरा. आज दि.१९ फेब्रुवारी रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त माणगांव येथील स्वराज्य सह्याद्रीचा ग्रुप माणगांव वतीने ३९४ वी शिवजयंती व शिवज्योत मिरवणूक वर्ष ६ वे मोठया उत्सहात साजरी करण्यात आली.

स्वराज्य सह्याद्रीचा ग्रुप तर्फे किल्ले रायगड येथून शिवज्योत घेऊन किल्ले रायगड ते महाड छत्रपती शिवाजी महाराज चौक ते माणगांव बालाजी कॉम्प्लेक्स अशी शिवज्योत मिरवणूक काढली यावेळी माणगांव नगरपंचायत चे नगराध्यक्ष श्री. ज्ञानदेवजी पवार व उन्माते मुस्लिमां कमिटी व सर्व मुस्लिम बांधव यांनी माणगांव येथील ढालघर फाटा येथे येणाऱ्या सर्व शिवज्योत च स्वागत केले त्याच प्रमाणे येणाऱ्या जाणाऱ्या शिव मावळ्यांसाठी चहा नास्ताची सोय केली होती.यावेळी स्वराज्य सह्याद्री ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सचिन पवार व उपाध्यक्ष राजु सुतार, खजिनदार अक्षय खरूसे,दत्ता सुतार, प्रणित सोनावणे, अनुराग वाटोरे, आदिनाथ पवार, क्रिश पवार , सतीश पवार, हर्ष वाटोरे प्रदीप पवार अनिकेत तेटगुरे व सर्व शिवमावळ्यांनी आभार व्यक्त केले. उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व नागरिकांचे माणगांव नगरपंचायत चे नगरध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी स्वागत केले.तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, शिवचरित्र आणि आजची परिस्थिती’ या विषयावर भाषण केले.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close