लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून दोघेजण लाचलुचपत खात्याच्या ताब्यात…… 

[avatar]

लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून दोघेजण लाचलुचपत खात्याच्या ताब्यात……

अलिबाग (रत्नाकर पाटील ) : गावातील विकासकामाचे अंदाजपत्रक मंजुरीच्या कामासाठी २५ हजाराची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून नवी मुंबईच्या लाचलुचपत विभागाने दोघांना आज गुरुवारी (दि. २२) चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.उरण पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील सहायक अभियंता श्रीमती रेश्मा नाईक आणि रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील सहायक अभियंता कांबळे अशी या दोघांची नावे आहेत. तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या गावातील विकासकामाचे अंदाजपत्रक मंजुरीच्या कामाकरिता रेश्मा नाईक यांनी 30 हजार लाचेची मागणी केल्याने तक्रारदाराने नवी मुंबईच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. 21 फेब्रुवारी रोजी करण्यात अलेल्या सापळा कारवाई दरम्यान रेश्मा नाईक यांनी तक्रारदारांना लाचेची रक्कम रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे सहायक अभियंता कांबळे यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार 22 फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान कांबळे यांना तक्रारदार यांच्याकडून 25 हजार लाचेची रक्कम बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, अलिबागच्या कार्यालयात स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close