श्री. द्रोणागिरी यंगस्टार सेवाभावी संस्थेच्या आरोग्य शिबिरास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद, मोफत चष्मा वाटपासह श्रवणयंत्राचे वाटप…नेरुळ येथील सनशाईन हॉस्पिटल व मुंबईच्या ओम काळभैरव चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या सहकार्याने शिवजयंती दिवशी तब्बल ५०० नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला…..  

[avatar]

श्री. द्रोणागिरी यंगस्टार सेवाभावी संस्थेच्या आरोग्य शिबिरास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद, मोफत चष्मा वाटपासह श्रवणयंत्राचे वाटप…नेरुळ येथील सनशाईन हॉस्पिटल व मुंबईच्या ओम काळभैरव चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या सहकार्याने शिवजयंती दिवशी तब्बल ५०० नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला…..  

  1. रोहा(नारायण खुळे): आपल्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त श्री. द्रोणागिरी यंगस्टार सेवाभावी संस्थेने शिवजयंतीचे औचित्य साधून रोहा तालुक्यातील मौजे कांडणे खुर्द येथे पंचक्रोशीतील नागरिकांसाठी भव्य असे मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले होते. नागरिकांनी या शिबीरास गतवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवीत सदर सेवेचा लाभ घेतला. ५००हुन अधिक नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करीत शिबीर यशस्वी पार पाडले. मुख्य म्हणजे यंदाच्या शिबिरात डोळ्यांची तपासणी करून २५०हुन अधिक मोफत चष्मे वितरित करण्यात आले. शिवाय परिसरात प्रथमच कमी ऐकू येणाऱ्या रुग्णांना मोफत श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आले.
    संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी केवळ १५ दिवसांत अहोरात्र मेहनत घेत शिबिराचे सुरेख नियोजन केले. महत्वाचे म्हणजे लोकवर्गणी व सदस्यांच्या स्वखर्चातून संपूर्ण शिबिराचे आयोजन केले. आजूबाजूच्या सुमारे १५ गावांतील नागरिकांनी शिबिरामध्ये सहभाग नोंदविला दिली. नागरिकांना त्यांच्या गावातून शिबिरास पोहोचण्याची कोणतीही अडचण भासू नये म्हणून संस्थेच्या वतीने मोफत प्रवासाचीही सोय केली होती.
    सदर कार्यक्रमास रोहा पोलीस स्टेशनचे अधिकारी सन्माननीय धामगुडे साहेब, व सन्माननीय झावरे साहेब, उपकेंद्र आरोग्य विभाग भालगाव डॉ. एल. के. पाटील तसेच इतर डॉक्टर देखील उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री. विनायक धामणे, ग्रामस्थ कांडणे खुर्द व कांडणे बुद्रुक पोलीस पाटील उपस्थित होते. ग्रुप ग्रामपंचायत भालगावचे आजी-माजी सदस्य, वैद्यकीय आरोग्य केंद्राच्या परिचारिका व कर्मचारी यांनी उपस्थिती दर्शविली. शिवाय रायगड जिल्ह्यातील प्रचलित व नामवंत मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जैन यांनी विशेष उपस्थिती दाखवीत शिबिरास व संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close