राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने १२ वी च्या परीक्षार्थीना पेन वाटप करून दिल्या शुभेच्छा……
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने १२ वी च्या परीक्षार्थीना पेन वाटप करून दिल्या शुभेच्छा……
रोहा(संतोष सातपुते) बारावी ची परीक्षा विद्यार्थ्यां साठी महत्त्वाची परीक्षा असते त्या परीक्षे च्या निकाला वर त्यांचे पुढील करियर अवलंबून असते ती परीक्षा गुरुवार दि. 22/02/2024 रोजी सुरू झाली त्या परीक्षार्थीना शुभेच्छा देण्यासाठी
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे रोहा शहर अध्यक्ष *माझ आशिकहुसेन सवाल* यांचे संकल्पनेतून उच्चमाध्यमिक शालांत परीक्षा २०२४ इयत्ता १२ वी च्या मेहेंदळे हायस्कूल च्या परीक्षार्थीना परीक्षेसाठी पेन भेट देऊन शुभेच्छा देऊन प्रोस्ताहित केले. त्या वेळी त्यांनी आपल्या मनोगतात म्हटले की हे पेन नसुन विध्यार्थ्यांच्या भविष्याचे छोटस शस्त्र आहे. मेहेंदळे हायस्कूल मध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गटनेते महेंद्र गुजर तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस उपाध्यक्ष प्रसाद प्रमोद पाटुकले, मयूर कोंडे, सागर पांचाळ व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सर्व सदस्य, शिक्षक वर्ग या वेळी उपस्थित होते. सादरहू कार्यक्रम मा. खासदार श्री सुनीलजी तटकरे,बालकल्याण मंत्री कु.अदितीताई तटकरे आणि विधान परिषदेत आमदार आनिकेत भाई तटकरे यांच्या मार्गदर्शना खाली उत्तम पार पडला.