पालकांनी लिटिल शाळेत पाल्याचे प्रवेश घेणे आवश्यक – तृप्ती पवार…… 

[avatar]

पालकांनी लिटिल शाळेत पाल्याचे प्रवेश घेणे आवश्यक – तृप्ती पवार……

माणगाव / खर्डी खुर्द(महेश शेलार) उत्कृष्ठ शिक्षणासाठी पालकांनी आपल्या पाल्याला जरूर लिटिल (केजी) शाळेत प्रवेश करून घेणे आवश्यक आहे असे प्रांजळ मत शाळेच्या २१ व्या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमा दरम्यान तृप्ती पवार यांनी मांडले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष नामांकीत हाडाचे चिकित्सक डॉ. जगदीश पटेल, नामंकीत सामाजिक कार्यकर्ते संजय महादेव गाँधी, महसूल सहायक अधिकारि तृप्ती राकेश पवार, शाळा समिति उपाध्यक्ष ॲड.राकेश मोरे, सदस्य आतिका हर्णेकर, शाळा संस्थापक अध्यक्ष पत्रकार नरेश पाटील सर सह आदी उपस्थीत होते.

दरम्यान आपल्या प्रमूख भाषणात तृप्ती मोरे यांनी प्रथम उपस्थित सर्वांचे स्वागत केले त्यानंतर म्हटले की, आज मला या कार्यक्रमाचे खास आमंत्रण दिल्या बद्दल आनंद व्यक्त करते. त्यांचे मी मनस्वी आभार व्यक्त करते. मी या शाळेची माजी पालक आहे त्यामुळे या शाळेची एकंदरीत शिक्षणाबद्दल समाधानी आहे. विद्यार्थी यांची हि शाळा म्हणजे अगदी दूसरा घरच म्हणावं लागेल. या शाळेचे सर्वे सर्वा पाटील सर यांची शिक्षण, पाल्य प्रगती बाबतीत सर्व शेर करत असतात. मी सर्व जनतेला विनंती करते की आपण आपल्या पाल्याला याच शाळेत उत्तम शिक्षणसाठी प्रवेश करून घ्यावे. ही शाळा ईतर नामँकित शाळे सारखी वाढावी असे सूचित केले व नक्कीच पाटिल सर या विनंतीला मान देऊन या शाळेला टॉप लेव्हलला नेतील असे मत व्यक्त केले. दूसरीकडे पालक देखील या शाळेला सहकार्य करतील असे दृढ विश्वास व्यक्त केले.

नरेश पाटील सर यानी स्टाफ वाढविले पाहिजे. पाटिल सर यांची शिक्षण शिकविण्याची पद्धत अतिशय उत्तम आहे त्याला मी सलाम देते. त्यांच्या अंगी असलेली इंग्रजी भाषा हे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर जोड अभ्यास राहील. शनिवारी जो विद्यार्थी येईल त्यांना अधिक फायदा होऊ शकतो असे सांगून शाळेला भावी वाटचालीसाठी खास शुभेच्छा दिल्या व सर्व विजेता विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close