बैलगाडा ला ग्लॅमर मिळवून देणाऱ्या गोल्डमॅन ची एक्झिट…… 

[avatar]

बैलगाडा ला ग्लॅमर मिळवून देणाऱ्या गोल्डमॅन ची एक्झिट……

अलिबाग (विषेश प्रतिनिधी)महाराष्ट्रातल्या बैलगाडा शर्यतीतील प्रसिद्ध नाव म्हणजे पंढरी शेठ फडके यांच हृदयविकाराचा झटक्यानं निधन झालं. दुपारी ऑफिस वरून घरी जाताना एक दीडच्या सुमारास कारमध्ये जाताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

पनवेलच्या विहिघरचे महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरी शेठ फडके यांचे आज पनवेल येथे निधन झाले. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता.

बैलगाडा प्रेमी गोल्डमॅन म्हणून ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते. जिथे बैलगाडा शर्यत तिथे पंढरी शेठ फडके हे समीकरण अगदी ठरलेले होते. बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. जवळपास 40-50 शर्यतीचे बैल त्यांच्या दावणीला अजूनही आहेत. मुळचे पनवेलचे असणारे पंढरीशेठ फडके हे बैलगाडा शर्यतीचे शौकिन म्हणून ओळखले जातात. पंढरीनाथ फडके हे आधी शेकाप पक्षात सक्रिय होते. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 1986 सालापासून वडिलांमुळे फडकेंना बैलगाडा शर्यतीची आवड निर्माण झाली होती.

बैलगाडा शर्यतीच्या मैदानात त्यांच्या हटके एन्ट्रीची, त्यांच्या सोन्याची आणि गाडीच्या टपावर बसून शर्यत बघण्याच्या आगळ्या वेगळ्या स्टाईलची चांगलीच चर्चा असायची. बैल नजरेत बसला की कितीही पैसे लागू द्या, त्याला विकत घेणारा ‘बैल’मालक म्हणून पंढरीशेठ यांची ओळख होती. काही महिन्यांपूर्वी डोंबिवली येथील बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केल्याने ते जास्तच चर्चेत आले होते. काही महिने जेल मध्ये घालवुन ते नुकतेच जामिनावर सुटले होते. आज त्यांचं निधन झालं आहे.

आज दुपारच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. आपल्या ऑफिसवरून घरी जाताना कारमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. पंढरीशेठ यांच्या जाण्याने बैलगाडा शर्यत प्रेमींना मोठा धक्का बसला आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close