बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत शिव समर्थ नगर महादेववाडी येथे शिवजयंती धुमधडाक्यात साजरी…….. 

[avatar]

बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत शिव समर्थ नगर महादेववाडी येथे शिवजयंती धुमधडाक्यात साजरी……..

रोहा (संतोष सातपुते) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक , आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे जयंती सोमवारी दिनांक ( 19 )रोजी रोहा तालुक्यातील शिव समर्थ नगर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

रोहा तालुक्यातील महादेववाडी येथील शिव समर्थ नगर येथे उपस्थित लोकांना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मागदर्शन करताना सांगितले की, येथील नविन वस्तीचे गेल्या वर्षी नामकरण करण्यात आले होते या वर्षी देखील शिव समर्थ नगरचा पहिला वर्धापन दिनानिमित्ताचे औचित्य साधून येथील लोकांचा एकोपा व आनंदी वातावरण असल्यामुळेच आपण वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करुन प्रत्येकांच्या मनामनामध्ये एक आगळावेगळा स्थान असल्यामुळेच आपण राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सणा प्रमाणेच उत्सव साजरा करीत असल्यामुळे मला यांचा अभिमान आहे. त्यामुळे मंडळाचे अध्यक्ष व सर्वांनी आपण दरवर्षी शिव जयंती साजरी करण्याचे ठरवलेलं असल्यामुळे येत्या काळात याच शिव समर्थ नगर यांच्या मंडळाला मोठं स्वरूप येत राहव अशी महाराज चरणीं प्रार्थना करिते अशा मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव भगत, वाशी ग्रामपंचायतीचे उपसरपंच अरविंद मगर, जेष्ठ नेते अनंता मगर , रोहा पोलीस स्टेशनचे निरीक्षक देविदास मुपडे , अध्यक्ष रत्नाकर चव्हाण, प्रज्योत गुरव, संदीप मगर ,जगदीश जाधव, रवींद्र जंगम, सुनील जाधव यासह मोठ्या संख्येने माता भगिनी उपस्थित होत्या.

तर सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम बक्षीस वितरण समारंभ , ज्येष्ठ नागरिक सन्मान निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धाटाव विभागातील युवा नेते तथा उपसरपंच अरविंद मगर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्ञानेश्वर साळुंखे, पत्रकार महादेव सरसंबे हे उपस्थित होते.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close