जमातुल मुस्लिम संस्था म्हसळा यांच्या वतीने पाणपोईचे उदघाटन……. 

[avatar]

जमातुल मुस्लिम संस्था म्हसळा यांच्या वतीने पाणपोईचे उदघाटन…….

तळा(विशेष प्रतिनिधी): म्हसळा एस.टी. स्टॅन्ड येथे पाणपोईचे उदघाटन आज दि. २०/०२/ २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता पाणपोईचे उदघाटन करण्यात आले. त्याप्रसंगी जमतुल मुस्लिम म्हसळा सचिव साजिद हुर्जुक, शुएब घराडे, शौकत घरटकर, मुनीर जमादार, फारुक डोसानी, बुरहान वसगरे, नईम दळवी, मुजीब साने, अभय कळमकर, मनोहर तांबे, अकमल कादरी, शहजाद लांबे, शाहनवाज उकये, अनेक मान्यवर उपस्थित होते.तसेच बाजारामध्ये हि पाणपोईची सुविधा करण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणी थंड फिल्टर पाण्याचे जार जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. तरी जनतेने या थंड पाण्याच्या पाणपोईचालाभघ्यावा. कोणत्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची गरज भासत असेल तर आपण संस्थेकडे संपर्क साधावा. पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात येईल.एस.टी.स्टॅन्डमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये तसेच उन्हाळा चालू झाला आहे,उन्हामुळेमाणसालाखाण्या पेक्षा पाण्याची जास्त गरज लागते.हे ओळखुन सामाजिक बांधिलकीचे भान राखत खारीचा वाटा उचलला आहे.सर्व धर्म समभाव,पाणी म्हणजे जीवन म्हणजे पाणी म्हणून संस्थेने हि पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्याचे ठरविले.आज पासून संस्थेने वरिष्ठांच्या हस्ते उदघाटन करुन जनतेसाठी अनमोल सेवा सुरु केली आहे तरी जनतेने या सेवेचा मनसोक्त लाभ घ्यावा. पाण्याचा वापर पिण्यासाठीच करावा इतर कामासाठी वापरू नये अशी संस्थेच्या वतीने विनंती केली आहे.या केलेल्या सोईबद्दल प्रवाशांनी धन्यवाद व्यक्त केले.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close