त्याग मुर्ती ” देवदूत ” भरत शेठ गोगावले……..!

[avatar]

त्याग मुर्ती ” देवदूत ” भरत शेठ गोगावले……..!

हल्लीच्या राजकीय परीस्थितीतीत आपल्या हातातोंडाशी आलेला घास आपलं मन मोठं करुन दुसऱ्याला खाऊ घालणे ही काही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी स्वतःकडे मनाचा मोठेपणा लागतो. त्यासाठी त्यागाची भावना लागते. आताच्या राजकारणात अशा प्रकारचा राजकीय त्याग क्वचितच आणि दुर्मिळ म्हणावा लागेल. मात्र माणगाव – महाड – पोलादपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि शिंदे शिवसेना पक्षाचे प्रतोद भरत शेठ गोगावले आपल्याला मिळत असलेले मंत्रीपद मित्राला बहाल करून मंत्रीपदाचा त्याग करुन समस्त महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना आदर्श घालून दिला आहे.

मंत्रीपद न मिळाल्याने काही आमदार आणि नेते खचून जातात. काही आमदार आणि नेते पक्षांतर करतात तर बरेचसे पुढारी आपल्याला एक ना एक दिवस मंत्री पद मिळेल या आशेवर राजकारण जगत असतात. मात्र आमदार भरत शेठ गोगावले खचून गेले नाहीत, डगमगले नाहीत किंवा नाराज झाले नाहीत. याउलट आपल्या मतदार संघात कोट्यावधी रुपयांची विकासकामे आणून सामान्य माणसाला दिलासा देण्याचे महान काम करीत आहेत. सामान्य माणसांशी नाळ जोडण्यासाठी अहोरात्र मेहनत आणि जिद्दीने अथक परिश्रम करणारा ” आपला माणूस ” म्हणून तळागाळापर्यंत सेवा देणारा आपल्याच घरातील कुटुंबातील सदस्य म्हणून त्यांनी मोठी ओळख निर्माण केली आहे.

महाड, पोलादपूर आणि माणगाव तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाताना तातडीने लोकांना नेहमीच दिलासा दिला आहे. महापुराची परीस्थिती असो वा दरड कोसळली असो आमदारकीची कवचकुंडले उतरवून संकटमोचक म्हणून पक्षीय भेद आणि जातीभेद विसरून ” मानवता हाच धर्म ” हे जाणून भरतशेठ कामगिरी करीत असतात. महाडला नेहमीच भरत शेठ गोगावले यांनी संकटातून वाचवण्यासाठी त्यांचा ” मसिहा” आणि ” तारणहार” बनले आहेत हे वारंवार सिद्ध झाले आहे. त्यांच्या एका फोनवर लालफितीत अडकलेल्या शासकीय फायली चुटकीसरशी वेगाने कामाला लागतात. भरत शेठ गोगावले प्रत्येक घराघरात पोहोचले आहेत. त्यांच्याबद्दल ” गरीबांचा शेठ – भरत शेठ” अशी कायमची बिरुदावली जनतेनी लावली आहे ती सार्थ ठरते आहे.

भरतशेठ गोगावले यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे काही जण त्यांच्यावर टीका टिप्पणी करीत असतात. त्यांना आपल्या विकास कामांनी सडेतोड उत्तर देतात. ते दिलखुलास बोलतात आणि स्पष्ट निर्भीडपणे व्यक्त होतात. त्यांच्या अनेक विकासकामांची दखल जनतेने घेतली आहे. संकटात धावून येणारा ” देवदूत” म्हणून जनतेने दिलेले पद हे मंत्रीपदापेक्षा जनतेच्या हृदयात कायमचे कोरले गेले आहे. ते कधीच पुसले जाणारे नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विश्वास आणि निष्ठा हीच त्यांना भविष्यात मंत्रीपदाची खुर्ची मिळवून देईल यात तिळमात्र शंका नाही असा आत्मविश्वास वाटत आहे.

माणगाव शहरातील १५ कोटींची नगरपंचायत इमारत, ५० कोटींची नवीन पाणी पुरवठा योजना या विकास कामांची मंजुरी तातडीने आणण्यात भरत शेठ गोगावले यशस्वी झाले आहेत. माणगाव शहरातील विकास आराखडा मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. अंतर्गत रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. नाट्यगृहाचे काम सुरू झाले आहे. दुर्लक्षित माणगाव आता विकसित करण्याचे “शिवधनुष्य ” आपल्या माणसाने घेतल्याचे पाहून माणगावकर भारावून गेले आहेत. आपल्याला आता हक्काचा माणूस भेटल्याचा आनंदोत्सव प्रत्येक जण साजरा करीत आहे. या आनंदात सामील होण्यासाठी अनेक कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. त्यामुळे आमदार भरत शेठ गोगावले यांना विधानसभा निवडणुकीत निजामपूर, लोणेरे आणि गोरेगाव मधून भरघोस मतांची आघाडी मिळेल असा विश्वास शिवसेना नेते ॲड. राजीव साबळे यांनी व्यक्त केला आहे.

शब्दांकन – अरुण पवार, माणगाव

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close