अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात : मॉरिस नोरोन्हा याचा पीए मेहुल पारीखच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची देखील शक्यता

[avatar]

अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात : मॉरिस नोरोन्हा याचा पीए मेहुल पारीखच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची देखील शक्यता……

अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात
मुंबईचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी आता मुंबई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. मेहुल पारीख आणि रोहित साहू असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावं आहेत. विशेष म्हणजे गोळीबार जेव्हा झाला त्यावेळी मेहुल पारीख देखील घटनास्थळी उपस्थित असल्याचे बोलले जात असून, तसा उल्लेख फेसबुक लाईव्हमध्ये घोसाळकर यांची हत्या करणाऱ्या मॉरिस नोरोन्हा याने केला होता. तर, मुंबईच्या एमएचबी पोलिसांनी 1 पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे देखील जप्त केली आहे.

मॉरिस नोरोन्हा नावाच्या व्यक्तीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर एकामागून एक पाच गोळ्या झाडल्या होत्या, त्यापैकी तीन गोळ्या घोसाळकर यांना लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी आता मुंबई पोलिसांकडून तपासाला सुरवात झाली आहे. पोलिसांनी गोळीबार करणारा आरोपी मॉरिस नोरोन्हा याचा पीए मेहुल पारीखला रात्रीच ताब्यात घेतले आहे. सोबतच रोहित साहू नावाच्या आणखी एकाला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यापूर्वी नेमकं काय घडलं, हत्या करण्याचे कारण काय?, घोसाळकर आणि मॉरिसमधील कोणता वाद होता? या सर्व प्रकरणाचा पोलिसांकडून आता तपास केला जात आहे. विशेष म्हणजे मॉरिस नोरोन्हा याचा पीए मेहुल पारीखच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची देखील शक्यता आहे.

फडणवीसांकडून माहिती घेण्यात आली…

अभिषेक घोसाळकर यांच्यावर करण्यात आलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात सतत अशा गोळीबाराच्या घटना घडत असल्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थितीत केले जात आहे. त्यामुळे अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणाची दखल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून, घडलेल्या सर्व प्रकरणाची माहिती त्यांनी पोलिसांकडून घेतली आहे. नेमकं प्रकरण काय होतं आणि कोणत्या वादातून घडलं याची माहिती फडणवीस यांनी पोलिसांकडून घेतली आहे.

हत्येचा गुन्हा दाखल…

अभिषेक घोसाळकरांच्या हत्येप्रकरणी पोलिसांकडून कलम 302 नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथाकथित सामाजिक कार्यकर्ता मॉरिस नरोना विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तूल जप्त केली असून, ही परदेशी बनावटीची पिस्तूल आहे. विशेष म्हणजे मॉरिसकडे पिस्तुलाचा परवाना देखील नव्हता. एमएचबी पोलिसांकडून हा गुन्हा आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close