मजगांव मराठी शाळेतील क्रीडा -सांस्कृतिक महोत्सव -२०२४ मधील फूड फेस्टिवल ठरले खास आकर्षण…..
मजगांव मराठी शाळेतील क्रीडा -सांस्कृतिक महोत्सव -२०२४ मधील फूड फेस्टिवल ठरले खास आकर्षण…..
कोर्लई(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील मजगांव येथील रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील क्रीडा -सांस्कृतिक महोत्सव -२०२४ मधील फूड फेस्टिवल खास आकर्षण ठरले !
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना जीवनाभिमुख अनुभव घेता यावा.याबरोबरच व्यवहार ज्ञान, अंकगणित व संवाद कौशल्य दृढ व्हावे.यातून विद्यार्थ्यांना पुस्तकातील संबोध व संकल्पना आत्मसात करता यावी तसेच त्याचा प्रत्यक्ष जीवनातील उपयोग कळावा.याउद्देशाने प्रथमच फूड फेस्टिवल घेण्यात आले.
यामध्ये विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य पणाला लावून विविध खाद्यपदार्थ यात मोदक, पुरणपोळी, पावभाजी, वडापाव,अंडापाव,मोमोज, पाणीपुरी, शेवपुरी, मिसळपाव, गुलाबजाम, सॅन्डविच, चायनीज भेळ तसेच पायनापल ज्यूस,लिंबू सरबत, चहा आदी.खाद्य-पेय यांचा सरपंच पवित्रा चोगले,सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच उपस्थित ग्रामस्थांनी आस्वाद घेतला व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.
शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष निखिल मानाजी, उपाध्यक्ष उमेश कोंडाजी, मुख्याध्यापक हेमकांत गोयजी,हर्षा नांदगांवकर,रंजिता केमकर, प्रमिला फुंडे, चेतन चव्हाण, मनीषा वाघरे, श्रृती आयरकर, सिद्धेश फेंगडू,नेहा डावरे शिक्षक वृंद यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.