एच आय व्ही एड्स आजाराबाबत लोककलेतून प्रिझम संस्थेच्या कलाकारांनी केली काशिद मध्ये जनजागृती…..

[avatar]

एच आय व्ही एड्स आजाराबाबत लोककलेतून प्रिझम संस्थेच्या कलाकारांनी केली काशिद मध्ये जनजागृती…..
अलिबाग (रत्नाकर पाटील )जिल्हा आरोग्य विभाग रायगड अलिबाग जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय रायगड अलिबाग यांच्या अंतर्गत डॉक्टर अंबादास देवमाने जिल्हा शल्य चिकित्सक रायगड व संजय माने जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली “बंधने पाळा, एड्स टाळा” या पथनाट्यातून काशिद येथे जनजागृती करण्यात आली.
यावेळी या कार्यक्रमास समीर धानदुरे लॅब टेक्निक ICTC मुरुड जंजिरा, प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तपस्वी गोंधळी तसेच पथनाट्य कलाकार नेहा पाटील, अथर्व भगत, स्वराज वाटकरे, कृतिका पाटील, विपुल पाटील, तुषार राऊळ, साक्षी मगर, स्वराज कोंडगुळी, स्मित पाटील, मनाली पाटील आदी उपस्थित होते. या पथनाट्यातून एचआयव्हीची तपासणी सरकारी रुग्णालयातील आयसीटीसी एकात्मिक समुपदेशन व सरकारी तपासणी केंद्र येथे करण्यात येते ही तपासणी मोफत आणि गोपनीय आहे. तसेच एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्यास तो त्या व्यक्तीच्या शरीरात कायम राहतो पण लक्षात ठेवा तुम्ही एचआयव्ही सोबत एक सामान्य जीवन जगू शकता फक्त वेळेवर औषध घेऊन या उपचाराचे नाव आहे एन्ट्री रेट्रो व्हायरल थेरपी ART तसेच एचआयव्ही होण्याची चार कारणे असुरक्षित लैंगिक संबंध, एचआयव्ही संक्रमित सुई, दूषित रक्त म्हणजेच एचआयव्ही संक्रमित रक्त घेणे टाळणे, एचआयव्ही संसर्गित गरोदर मातेपासून बाळाला एचआयव्ही होण्याची शक्यता असते जर गरोदर मातेला एचआयव्ही झाला असेल तर तिच्या होणाऱ्या बाळाला देखील एचआयव्ही संसर्ग होऊ शकतो म्हणून गरोदर मातांनी पहिल्या तीन महिन्याच्या आत एचआयव्ही चाचणी करणे गरजेचे आहे जवळच्या सरकारी रुग्णालयातच रजिस्ट्रेशन आणि बाळंतपण होणे गरजेचे आहे.एच आय व्ही एड्स प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2017 एचआयव्ही बाधित लोकांबरोबर भेदभाव होऊ नये म्हणून हा कायदा बनवण्यात आला स्वरूपात शिक्षा होऊ शकते.
जर शैक्षणिक क्षेत्रात हॉस्पिटलमध्ये किंवा कोणत्याही कार्यालयात एचआयव्ही एड्स संक्रमित व्यक्तीस बरोबर भेदभाव झाल्यास राज्यातील लोकपाल अधिकाऱ्यांकडे किंवा 1097 वर आपण तक्रार दाखल करू शकता.
गुप्तरोग झाल्यास योग्य वेळी तपासणी आणि उपचार घेतल्यास पूर्णपणे बरा होऊ शकतो गुप्त रोगाचे तपासणी ही जवळील सरकारी हॉस्पिटलमधील सुरक्षा क्लिनिकमध्ये केली जाते.
अधिक माहितीसाठी या टोल फ्री क्रमांक वर कॉल करा तसेच न्याको चे ॲप डाऊनलोड करून माहिती घेऊ शकता असे सांगितले.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close