एक गाव पाच कॅमेरे उपक्रम राबविणार – सहा.पो.नि. हरेश काळसेकर….शांतता कमिटीत केले प्रतिपादन….. 

[avatar]

एक गाव पाच कॅमेरे उपक्रम राबविणार – सहा.पो.नि. हरेश काळसेकर….शांतता कमिटीत केले प्रतिपादन…..

नागोठणे(महेंद्र माने) येथील पोलिस ठाण्यामध्ये गुरुवार 08 फेब्रुवारी रोजी आगामी येणार्‍या सण,उत्सव व निवडणुक अनुषंगाने आयोजित केलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत सहाय्यक पोलिस निरीक्षक हरेश कोळसेकर यांनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येक गावात एक गाव पाच कॅमेरे हा उपक्रम राबविणार असल्याचे प्रतिपादन केले.यावेळी मा.प.सं.सदस्य बिलाल कुरेशी,शांताराम गायकवाड, नाझिम नालखंडे,बापू रावकर,एकनाथ ठाकुर,किशोर म्हात्रे,कीर्तीकुमार कळस,मनोज धात्रक,असपाक पानसरे,आशिफ मुल्ला,चेतन कामथे,नीलेश भोपी,हुसेन पठाण,मंदार चितळे,मुजाफर मुल्ला,बाबा मुल्ला यांच्यासह विभागातील नागरिक उपस्थित होते.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना हरेश काळसेकर यांनी सांगितले की, सर्व जाती धर्म एकच आहेत परंतु एकादा जातीय तेट निर्माण करण्याचा प्रयत्न करतो पण त्याचा काहीही उपयोग होत नाही त्याच्याकडे लक्ष न देता सामाजिक सलोखा कसा राहील हे आपण सर्वांनी बघितले पाहिजे. वाद होणार नाही याची दक्षता घ्या.तुम्ही आमचे पोलिसांचे डोळे आहात सहकार्य करा.भांडण व वाद जर कोणी करत असेल त्याची माहिती आम्हाला द्या. सोशल मीडिया हा सर्व धर्मासाठी वीष आहे ते पसरणार नाही याची दक्षता घ्या व मीडियाचा वापर काळजी पूर्वक करा. तरुणांना समजावून सांगा की एक जरी पोलिस केस झाली तर तुमचे करियर खराब होऊ शकते.गाव,शहर जसे वाढत जाते तशी लोक संख्याही वाढते तेथे बाहेरील लोके येतात त्यात गुन्हेगारीतही वाढ होत असते त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लागणे आवश्यक आहे. त्यामुळे गुन्हेगारी किंवा कोणतेही अनुचित प्रकार लवकर उघडकीस येतात. नागोठणे शहरात बर्‍याच ठिकाणी कॅमेरे आहेत जेथे आवश्यक आहे त्या ठिकाणी तसेच विभागासाठी गावांमध्ये एक गाव पाच कॅमेरे बसविण्याचा उपक्रम आम्ही लवकरच राबविणार असून त्यासाठी गावातील दानशूर व्यक्तिने मदत करणे गरजेचे असल्याचे सांगून चौका चौकात आपण लावत असलेले बॅनर व झेंडे मुदतीत काढा जेणे करून त्याची विटंबना होणार नाही,वाहतुकीचे नियम पाळा,कायदा हातात घेऊ नका असे शेवटी काळसेकर यांनी सांगितले.यावेळी उपस्थित सदस्यांनी आपले विचार मांडून गावातील समस्या व काही सूचना उपस्थित करून विचारलेल्या प्रश्नांना काळसेकर यांनी समाधानकारक उत्तरे दिले. उपस्थितांचे आभार पोलिस हवालदार महेश लांगी यांनी मानले.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close