उद्योजक विजय लोखंडे उद्योग मंत्र्यांच्या हस्ते राज्य निर्यात पुरस्काराने सन्मानित…..रायगड जिल्ह्यातील ४ उद्योगांना राज्य निर्यात पुरस्कार प्रदान……. 

[avatar]

उद्योजक विजय लोखंडे उद्योग मंत्र्यांच्या हस्ते राज्य निर्यात पुरस्काराने सन्मानित…..रायगड जिल्ह्यातील ४ उद्योगांना राज्य निर्यात पुरस्कार प्रदान…….

पनवेल(विशेष प्रतिनिधी)महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागातर्फे रायगड जिल्ह्यातील ४ उद्योगांना राज्य निर्यात पुरस्कार प्रदान करण्यात आले,त्यामध्ये पनवेल औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष,उद्योजक विजय लोखंडे यांना उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते राज्य निर्यात पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार उद्योजक विजय लोखंडे आणि दिप विजय लोखंडे यांनी स्विकारला.या पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल उद्योजक विजय लोखंडे,दिप विजय लोखंडे यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्काराचे वितरण तसेच देशातील 24 तज्ज्ञ संस्थासोबत करण्यात आलेल्या सामंजस्य करार प्रसंगी ते बोलत होते.यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, उद्योगविकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह,अपर उद्योग आयुक्त प्रकाश वायचळ,अपर उद्योग संचालक संजय कोरबु,उद्योग सह संचालक शैलेश रजपूत आदी उपस्थित होते.

मे.नाईक ओशियनिक एक्सपोर्टस् प्रा.लि., एम,5,एमआयडीसी,तळोजा,
मे. एच के एस एमपेक्स,प्लॉट नं 3, पनवेल इंडस्ट्रीयल को-ऑप इस्टेट लि.,नवी मुंबई फायनरी,
मे.गंधार ऑईल फायनरी (इंडिया), टी-10, एम.आय.डी.सी. तळोजा ता. पनवेल,
मे. कपुर ग्लास इंडिया प्रा.लि.,200/201/212, जवाहर को-ऑप इंडस्ट्रीयल इस्टेट,कामोठे, पनवेल या घटकांना उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते राज्य निर्यात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पुरस्कारार्थीचे अभिनंदन करून ते म्हणाले,पुरस्काराला अन्ययसाधारण महत्व असून पुरस्कार प्राप्त व्यक्ती, संस्था यांचा आदर्श घेऊन राज्यातील इतरांनी उद्योग उभारले पाहिजे,त्या उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती झाली पाहिजे, हा पुरस्कार देण्यामागचा हेतू असतो.महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्काराचे स्वरुप अधिक व्यापक करण्यासाठी उद्योजकांची समिती गठीत करण्याची सूचना केली.पुरस्काराचे प्रस्ताव समितीकडे देण्यात यावे,प्रस्तावाच्या अनुषंगाने समितीच्या प्राप्त सूचना विचारात घेऊन आगामी काळात पुरस्काराचे वितरण करण्यात येईल,असेही उद्योगमंत्री श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close