रायगड जिल्ह्यातील गुन्हाचा चढता आलेख…. रायगड पोलिसांनी लावला 2366 गुन्ह्यांचा छडा…….
रायगड जिल्ह्यातील गुन्हाचा चढता आलेख…. रायगड पोलिसांनी लावला 2366 गुन्ह्यांचा छडा…….
अलिबाग (रत्नाकर पाटील)जिल्ह्यात 2023 मध्ये घडलेल्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात रायगड पोलिसांना मोठे यश आले असले तरी 2022 च्या तुलनेत गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. समाधानाची बाब म्हणजे चोरी, घरफोडी, जबरी चोरीसारख्या सुमारे 2 हजार 715 गुन्ह्यांपैकी 2 हजार 366 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. प्रलंबित प्रमाण हे फक्त बारा टक्के आहे, अशी माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. या वेळी अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक बाळासाहेब खाड आदी उपस्थित होते.
वर्षभरात 26 खूनाचे गुन्हे दाखल झाले होते पैकी 24 खुनाचे गुन्हे पोलिसांनी उघड केले आहेत. खुनाच्या प्रयत्नाचे 29 पैकी 29 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीही पोलिसांनी जेरबंद केले आहेत. जबरी चोऱ्यांमधील 44 गुन्ह्यांची 93 टक्क्यांची उकल केली आहे. घरफोडीमधील 175 गुन्हे आणि चोरीच्या 472 गुन्ह्यांपैकी 300 गुन्हे उघडकीस आणले आहेत. जिल्ह्यातील दंगलींचे 115 गुन्हे आणि 383 दुखापतीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. अतिप्रसंग, विनयभंग, अपहरणाचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. 821 इतर गुन्ह्यांपैकी 757 गुन्ह्यांची उकल रायगड पोलिसांनी केली असल्याचे घार्गे म्हणाले.
जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या बेकायदा जुगार अड्ड्यांवर रायगड पोलिसांनी वर्षभरात 193 ठिकाणी छापे टाकले. त्यामध्ये 1 कोटी 17 लाख 40 हजार 682 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बेकायदा दारू विक्री वाहतूक, निर्मिती करणाऱ्या 615 ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत 53 लाख 4 हजार 788 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अमली पदार्थ सदराखाली 18 ठिकाणी कारवाई करण्यात आली. यामध्ये 1 लाख 43 हजार 516 रुपयांचा गांजा, 324 कोटी 63 लाख 5 हजार 160 रुपयांचा मेफेड्रोन आणि 8 कोटी 25 लाख 11 हजार 876 रुपयांचे चरस जप्त करण्यात आल्याकडे घार्गे यांनी लक्ष वेधले.
जिल्ह्यातून तीन गुन्हेगारी टोळ्यांसह
अपहरणाचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. 821 इतर गुन्ह्यांपैकी 757 गुन्ह्यांची उकल रायगड पोलिसांनी केली असल्याचे घार्गे म्हणाले.
जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या बेकायदा जुगार अड्ड्यांवर रायगड पोलिसांनी वर्षभरात 193 ठिकाणी छापे टाकले. त्यामध्ये 1 कोटी 17 लाख 40 हजार 682 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बेकायदा दारू विक्री वाहतूक, निर्मिती करणाऱ्या 615 ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत 53 लाख 4 हजार 788 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अमली पदार्थ सदराखाली 18 ठिकाणी कारवाई करण्यात आली. यामध्ये 1 लाख 43 हजार 516 रुपयांचा गांजा, 324 कोटी 63 लाख 5 हजार 160 रुपयांचा मेफेड्रोन आणि 8 कोटी 25 लाख 11 हजार 876 रुपयांचे चरस जप्त करण्यात आल्याकडे घार्गे यांनी लक्ष वेधले.
जिल्ह्यातून तीन गुन्हेगारी टोळ्यांसह सहा अट्टल गुन्हेगारांना हद्दपार केले आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बिघडविणारे, समाजात कलह निर्माण करणाऱ्या 7 हजार 935 जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. अवैध बंदूक, दारूगोळा बाळगल्याप्रकरणी 15 ठिकाणी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 15 बंदुका जप्त केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.