बेकायदा अग्नीशस्त्र व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तरुणाची तळोजा जेल मध्ये रवानगी……. 

[avatar]

बेकायदा अग्नीशस्त्र व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तरुणाची तळोजा जेल मध्ये रवानगी…….
पनवेल(संजय कदम) : बेकायदा अग्नीशस्त्र व जिवंत काडतुसे जवळ बाळगल्या प्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याची रवानगी तळोजा जेल मध्ये केली आहे.

आरोपी रजनीशराज सत्येंद्रकुवर सिंग रा.इंडिया बुल्स याच्याकडे सिल्वर रंगाचे लोखंडी पिस्ट्ल ज्याची किंमत पन्नास हजार रुपये इतकी आहे. तसेच चार जिवंत पितळी काडतूसे असा मिळून जवळपास पन्नास हजार आठशे रुपये किमतीचा ऐवज विनापरवाना जवळ बाळगून असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पोवार, गुन्हेशाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना कुदळे व पथकाने सदर तरुणाला कोनगाव येथून ताब्यात घेऊन त्याच्या कडून बेकायदा अग्नीशस्त्र व जिवंत काडतुसे हस्तगत केले. यावेळी गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार महेश धुमाळ, पोलीस हवालदार विजय देवरे, पोलीस हवालदार सुनील कुदळे, पोलीस शिपाई आकाश भगत आदींच्या पथकाने या तरुणाची सखोल चौकशी करून सदर अग्निशस्त्र कोणासाठी व कुठून आणले होते ? या संदर्भात माहिती घेतले व त्याची सध्या रवानगी तळोजा जेलमध्ये करण्यात आली आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close