महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन च्या द प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड 2023 हा मानाचा पुरस्कार रोह्याचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व श्री.महेंद्र रमेश गुजर याना देऊन सन्मानित…… 

[avatar]

महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन च्या द प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड 2023 हा मानाचा पुरस्कार रोह्याचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व श्री.महेंद्र रमेश गुजर याना देऊन सन्मानित……
रोहा(संतोष सातपुते) रोहा म्हणजे महाराष्ट्रातील व रायगड जिल्ह्यातील एक नावाजलेले छोटेखानी शहर,
या शहराला सी.डी. देशमुख (भारताचे अर्थमंत्री), प.पु.पांडुरंग शास्त्री आठवले (स्वाध्याय प्रणेते), मधुकर भावे (जेष्ठ पत्रकार) ना.सुनीलजी तटकरे (खासदार) यांच्या नावाचे वलय प्राप्त झाले आहे. त्यांचा वारसा असाच पुढे चालू ठेवणारे
रोह्याचे माजी नगरसेवक, माजी उपनगराध्यक्ष, गटनेते श्री,महेंद्रभाई रमेश गुजर यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन चा द प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड 2023 या पुरस्काराने सामाजिक सेवेबद्दल *रवींद्र भवन नाट्यगृह,गोवा* येथे
रविवार दि,28 मे 2023 रोजी मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
श्री, महेंद्रभाई रमेश गुजर हे रोहेकारानं साठी सर्वपरिचित व्यक्तिमत्व अतिशय नीटनेटका पेहराव,बोलके डोळे, चेहऱ्यावर कायम हास्य, स्वच्छ व पारदर्शक मन, जीवाला जीव देणारा स्वभाव , घरंदाज व खानदानी व्यापारी व उद्योजक असे हे रोह्यामधील एक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील दानशूर असे सामाजिक कार्यात सतत आघाडीवर असलेले व्यक्तिमत्त्व. त्यांना हा मनाचा पुरस्कार मिळाल्या मुळे रोहा व संपूर्ण रायगड जिल्ह्यातुन सामाजिक, राजकीय तसेच अनेक क्षेत्रातील मान्यवरां कडून अभिनंदना चा व पुढील वाटचालीस शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close