मुरुडमध्ये प्रथमच जंजिरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ठरले रसिकजनांचे आकर्षण…… 

[avatar]

मुरुडमध्ये प्रथमच जंजिरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ठरले रसिकजनांचे आकर्षण……

कोर्लई(राजीव नेवासेकर) मुरुडमध्ये प्रथमच हिंदू एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात दिमाखात संपन्न झालेल्या जंजिरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास तमाम रसिक जनांचा भरभरून प्रतिसाद मिळाला ! जंजिरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव प्रथम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नुकताच मुरुड जंजिरा येथील हिंदु एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात पार पडला. पहिलेच वर्ष असलेल्या या महोत्सवाला रसिक प्रेक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
जंजिरा महोत्सवाचे प्रमुख श्रेयश दांडेकर आणि नरेश माळी यांचे लघुचित्रपट महोत्सव आयोजित करण्याचे प्रयोजन मूलतः नाविन्यपूर्ण आणि समाजप्रबोधन करण्याऱ्या फिल्ममेकर्सना प्रोत्साहन मिळावं आणि त्याच्या कल्पनेशक्तीला वाव मिळाला आणि चांगली संधी उपलब्ध व्हावी यासाठी होता.
या महोत्सवात देशपरदेशातून तब्बल २२५ लघुपटांचा समावेश करण्यात आला होता. त्यात विशेषतः युनायटेड स्टेट्स, इटली, पोर्तुगाल, साऊथ आफ्रिका, पाकिस्तान, मोरोक्को, युनायटेड किंगडम, स्पेन, ब्राझील, फ्रान्स, पेरू, युनायटेड अरब इमारत्स, ऑस्ट्रेलिया, रोमानिया, बांगलादेश, पोलंड, कॅनडा, माल्टा, जर्मनी, डेन्मार्क, क्रोएशिया, सिरियन अरब रिपब्लिक, व्हेनेझुएला बोलिवेरियन, फिलिपिन्स अशा भारतासह परदेशातूनही बऱ्याच लघुपटांचा समावेश होता. या सर्व लघुपटातील काही लघुपटांचे प्रदर्शन प्रदर्शित केले गेले.
सर्व चित्रपटांना मिळणारा उत्तम प्रतिसाद पाहून आणि विजेते लघुपट प्रदर्शन व बक्षिस वितरण समारंभ रसिक प्रेक्षकांसाठी सभागृहात भरवण्यात आला.

या लघुपट महोत्सवाला लेखक दिग्दर्शक अभिनेता चेतन मुदगल ,तसेच लेखक कवी आणि कलासागरचे अध्यक्ष संजय गुंजाळ, अभिनेत्री स्वाती भुवड, जेष्ठ पत्रकार मदन हणमंते व माजी मुख्याध्यापक उदय गद्रे आणि पांडुरंग अरेकर सर अशा दिग्गज कलाकारांची सन्माननीय उपस्थिती लाभली.
या चित्रपट महोत्सवाचे आयोजन झीरो प्रॉडक्शन चे कलाकार श्रेयश सुधीर दांडेकर आणि नरेश लक्ष्मण माळी तसेच पायल जासुद , सुयश गद्रे , सुयोग दिवेकर ,प्रवेश पालशेतकर,उत्कर्ष महाडिक,सानिका कौलकर,साक्षी गुप्ते आणि संपूर्ण टीम यांनी
गोल एन्टरटेन्मेन्ट वल्ड अंतर्गत केले होते.
नृत्य दिग्दर्शक प्रवेश पुलेकर यांच्या गृपने दिप नृत्य आणि लोकननृत्य करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुपटाचे पारितोषिक दिपक शिंदे दिग्दर्शित ‘धडा द लेसन’ या लघुपटाला मिळाले त्याचप्रमाणे अक्षय वास्कर दिग्दर्शित ‘विधिलिखित’ आणि संजय पडंव दिग्दर्शित ‘गुरूदक्षिणा’ आणि अतुल धुरी दिग्दर्शित ‘काॅमन सेन्स’ या लघुपटाला मिळाला.
सर्वोत्कृष्ट लघुपट यामध्ये ‘ फुल मुन ‘, आऊट ऑफ द बाॅस्क, ‘मोन्या’ ‘खरंच याची गरज आहे का !?’ आणि ‘परिस’ यांना मिळाला.
या चित्रपट महोत्सवाचे निवेदन आणि आभार प्रदर्शन प्रवेश पालशेतकर यांनी केले होते.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close