विळे सरपंच गजानन मोहिते राष्ट्रवादीला रामराम करून भाजप मध्ये जाणार……
विळे सरपंच गजानन मोहिते राष्ट्रवादीला रामराम करून भाजप मध्ये जाणार……
वावेदिवाळी (गौतम जाधव)
माणगांव तालुक्यातील निजामपुर विभागातील विळे ग्रूप ग्रामपंचायतीचे राष्ट्रवादीचे कार्यरत सरपंच गजानन मोहिते हे राष्ट्रवादी पक्षाला अखेरचा राम राम करून ते दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर भारतीय जनता पार्टीत मध्ये काही ग्रा.प. सदस्य तसेच असंख्य कार्यकर्ते घेवून जाहीर प्रवेश करणार असल्याचे विळे सरंपच गजानन मोहिते यांनी प्रतिनिधी जवळ बोलताना सांगितले.
पुढे त्यांनी बोलताना सांगितले की मी गेली दहा वर्षे राजकारणात एक निष्ठेने काम करत असून माझी मिसेस ही गेली पाच वर्षे विळे ग्रामपंचायतीची सरपंच होती.तसेच मी आता साडे तिन वर्ष सरपंच आहे.राष्ट्रवादी पक्षाचे काम आम्ही विळे ग्रामपंचायती मधून एक निष्ठेने करत आलो आहोत परंतु त्याचा काहीच फायदा नाही. विळे भागाड एम आय डिसी असून देखील या कंपनीत आमच्या मुलांना रोजगार मिळत नाही अनेक सुशिक्षित तरूण हे डिग-या डीप्लोमा घेवून घरी बसले आहेत. आमच्या प्रश्नाकडे आमच्या पक्षाचे लोक प्रतिनिधी असतील किवा जिल्हाचे, तालुक्याचे पुढारी हे देखील लक्ष देत नसल्यामुळे राष्ट्रवादी पक्ष आम्ही सोडत आहोत.
तसेच विकास कामासाठी व तरूणांनाच्या हाताला रोजगार देणारा भारतीय जनता पार्टी हा पक्ष देशातील महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्या मध्ये एक मेव पक्ष असून मी व माझे काही ग्रा.प.सदस्य व विळे विभागातील बहुसंख्य असे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे राष्ट्रवादी पक्षालाअखेरचा राम राम करून भाजप पक्षात मध्ये जाणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.