‘सही शुरुवात’ मोहिमेचे आयोजन…..

[avatar]

 ‘सही शुरुवात’ मोहिमेचे आयोजन….

 पनवेल(प्रतिनिधी) गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडचा ब्रँड असलेल्या गोदरेज व्हेज ऑईलने त्यांच्या ‘सही शुरुआत’ या मोहिमेंतर्गत एक नवीन व्हिडीओ सादर केला आहे. लोकांच्या आयुष्यात आनंद फुलविण्यासाठी अन्नपदार्थ किती मोलाची भूमिका पार पाडत असतात हे ठसविण्यासाठी या व्हिडीओ मध्ये प्रसिद्ध मराठी नाट्य आणि चित्रपट अभिनेते भाऊ कदम आणि बॉलीवूड अभिनेत्री आणि शेफ तारा देशपांडे यांनी काम केले.या व्हिडीओ मध्ये हे दोन कलाकार एकमेकांशी मजेने थट्टामस्करी करताना दिसणार आहेत. खाणं कसं चवीच्या पलीकडे नेणारं असतं आणि त्यातून एकत्वाची भावना कशी वाढीला लागू शकते यावर यात भर देण्यात आला आहे. आपल्यापैकी अनेक जण स्वयंपाकाकडे छंद, आकांक्षा किंवा आनंदासाठी मजेने करायचे काम म्हणून बघतो. असे असले तरी, प्रत्येक क्षण आनंदात परिवर्तीत करून आपल्या आयुष्यात लोकांना एकत्र आणण्यात अन्न महत्वाची भूमिका पार पाडत असते. प्रत्येक खाद्यपदार्थ हा त्यातील घटक, चव, रंग-रूप याने वेगळा असला तरी स्वयंपाकाची प्रक्रिया बह्तांशवेळेला एकाच मुख्य घटकाने सुरु होते आणि तो घटक म्हणजे स्वयंपाकासाठी वापरले जाणारे खाद्यतेल. आनंद, मजा यांचा शिडकाव असणारे चांगले अन्न म्हणजे एक सुंदर अनुभव असतो. या व्हिडीओ मध्ये लोकप्रिय महाराष्ट्रीयन पदार्थ ‘शिरा’ बनविताना भाऊ कदम आणि तारा देशपांडे यांनी परस्परांबरोबर आत्यंतिक सौहार्द आणि एकत्वाचे दर्शन घडविले आहे. डिजिटल युगाचा प्रभाव लक्षात घेता, हा व्हिडीओ विविध डिजिटल प्लॅटफॉर्म आणि गोदरेजच्या अनेक सोशल मिडिया हँड्ल्सवर आणि इतर प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे. सही शुरुआत या स्पर्धेच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या जोडीदाराशी जोडणाऱ्या खाद्यपदार्थाची माहिती देण्याविषयी विचारणा करण्यात येत असून डिजिटल प्लॅटफॉर्मवर ते दाखविले जातील.गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक आणि अध्यक्ष नितीन नाबर म्हणाले, “आमच्या ‘सही शुरुआत’ मोहिमेसाठी भाऊ कदम आणि तारा देशपांडे यांच्याशी जोडले जाताना आम्हांला खूप आनंद होत आहे. जसे हे दोन्ही कलाकार त्यांचा निखळ विनोद आणि सर्वोत्कृष्ट दर्जेदार आशय सादर करण्याबद्दल ओळखले जातात तसेच गोदरेज व्हेज ऑईलही चव, शुद्धता, गुणवत्ता यासाठी ओळखले जाते. या सहयोगात या काही छान समान गोष्टी आणि बंध आहेत जे आमच्या गोदरेज व्हेज ऑईलच्या गुणांना पुढे आणते.”या सहयोगाबद्दल बोलताना अभिनेते भाऊ कदम म्हणाले, “कुटुंबीय आणि मित्रमंडळी यांच्यासोबत चांगल्या अन्नाचा आस्वाद घेण्यामुळे आपल्याला एकमेकांशी जोडून राहणे शक्य होते. जेवताना बहुतेकवेळेला आपण छान गप्पा मारतो. त्यातून परस्परांमधील बंध आणखी घट्ट होतात. गोदरेज व्हेज ऑईल्सकडे विविध प्रकारची तेल आहेत. त्यामुळे आपल्याला स्वयंपाक करणे आणि असंख्य प्रकारच्या आपल्या लाडक्या पदार्थांचा आस्वाद घेणे शक्य होते. आपण बनवत असलेल्या प्रत्येक पदार्थासाठी ‘सही शुरुआत’ करून देण्याची खात्री देणाऱ्या तेलांची गोदरेजकडे असलेली व्यापक मालिका बघून मी चकित झालो. या जाहिरात मोहिमेसाठी तारा आणि गोदरेज बरोबर काम करणे हा खूपच छान अनुभव आहे.” 

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close