मुंबई गोवा महामार्गावर उभ्या पोलीस जीपगाडीला ट्रकची धडक, साह.पोलिस व पोलिस चालक जखमी,……
मुंबई गोवा महामार्गावर उभ्या पोलीस जीपगाडीला ट्रकची धडक, साह.पोलिस व पोलिस चालक जखमी……..
नागोठणे प्रतिनिधी(दिपक सोनावणे) मुंबई गोवा महामार्गावर आपघतांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून चक्क एका भरधाव ट्रक चालकांनी उभ्या असलेल्या पोलिस जीपगाडीला धडक दिल्याने नागोठणे पोलिस निरिक्षक आणि चालक पोलिस हे दोघे जखमी झाल्याची खळबळ जनक घटना मार्गावरील सुकेळी जिंदाल नजिक मंगळवारी 3 सप्टेंबर रोजी घडली आहे.
मुंबई गोवा महामार्गावर सुकेळी हद्दीतील जिंदाल नजिक मंगळवारी 3 सप्टेंबर रोजी ट्रक क्रमांक एम एच 46 ए एफ 8792 हा मार्गालगत पलटी झाला असल्याचे समजताच गस्ती करण्यास गेलेले पोलिस बोलेरो जीप क्रमांक एम एच 06 सी डी 4897 उभ्या असलेल्या उभ्या बोलेरो जीपगाडीला ट्रक चालक सुभाष त्रिजुगी यादव वय 38 आपल्या ताब्यातील ट्रक क्रमांक एम एच 06 ए क्यु 9601 ट्रक भरधाव वेगाने जोरदार धडक दिल्याने हा आपघात घडला असून सदरच्या आपघातात नागोठणे पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस आणि चालक हे यात जखमी झाले असल्याचे समजते.
वरील तारखेस वेळी व ठिकाणी ट्रक क्रमांक एम एच 46 ए एफ 8792 हा मौजे सुकेळी गावचे हद्दीत जिंदाल कंपनी समोर रस्त्याचे खाली पलटी झालेला होता. त्यावेळी विभागीय गस्ती करीता असलेले जखमी साक्षीदार सहा पोलीस निरीक्षक कुलकर्णी हे कोलाड पोलीस ठाणे येथे भेट देवुन नागोठणे येथे परत येत असताना ट्रक पलटी झालेले ठिकाणी शासकीय जिप उभी करुन मदतीकरीता रोडचे साईडला थांबले असता यांतील आरोपीत नामे सुभाष त्रिजुगी यादव याने दारुचे नशेत त्याचे ताब्यातील ट्रक क्रमांक एम एच 06 ए क्यू 9601 हा नागोठणे बाजूकडून कोलाड बाजुकडे मुंबई गोवा हायवेने अतिवेगात, हयगयीने, बेदरकारपणे चालवून त्याची शासकीय जिपला समोरुन ड्रायव्हर बाजुला धडक लागल्याने अपघात झाला. सदर अपघातात साक्षीदार सहा. पोलीस निरीक्षक कुलकर्णी व चापोशि/737 महाडीक यांचे लहान मोठ्या स्वरुपाच्या दुखापती होणेस तसेच दोन्ही वाहनांचे नुकसानीस कारणीभुत झाला म्हणून वगैरे मजकूरची खबर रजि. दाखल केली. सदर गुन्ह्याचा तपास प्रभारी अधिकारी सो. नागोठणे पोलीस ठाणे यांचे आदेशाने पोसई श्री चव्हाण हे करीत आहेत.