जे एस एम महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हास्तरीय नियोजन सत्र संपन्न…….
जे एस एम महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हास्तरीय नियोजन सत्र संपन्न…….
अलिबाग(विशेष प्रतिनिधी) मुंबई विद्यापीठ आणि जे. एस. एम. कॉलेज एन. एस. एस. युनिटच्या माध्यमातून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकाऱ्यांसाठी रायगड जिल्हास्तरीय नियोजन सत्र दिनांक २९ ऑगस्ट, २०२४ रोजी संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतमभाई पाटील, श्री सुशील शिंदे, विशेष कार्यकारी अधिकारी एन. एस. एस. मुंबई विद्यापीठ, श्री रमेश देवकर, एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी, मुंबई विद्यापीठ, श्री तुळशीदास मोकल, रायगड जिल्हा समन्वयक, श्री निखिल कारखानीस, एन. एस. एस. जिल्हा समन्वयक, मुंबई उपनगर, प्राचार्या डॉ. सोनाली पाटील, एन एस. एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड, प्रा. अश्विनी आठवले, डॉ. पंकज घरत तसेच रायगड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील ८० एन.एस. एस. कार्यक्रम अधिकारी सहभागी झाले होते.
श्री सुशील शिंदे यांनी उदघाटनपर मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, राष्ट्रीय सेवा योजना ही एक प्राध्यापकांकारिता संधी आहे ज्यामध्ये प्राध्यापक विद्यार्थ्यांसोबत सामाजिक उपक्रम राबवून व्यक्तीमत्व विकास साधू शकतात.
अॅड. गौतमभाई पाटील यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, एन. एस. एस. हे एक व्यक्तीमत्व विकासाचे व समाजसेवेचे उत्कृष्ट माध्यम आहे. तसेच त्यांनी आपण एन. एस. एस. स्वयंसेवक म्हणून काम करत असतानाचे अनुभव सांगितले. आपल्या मनोगताच्या शेवटी अध्यक्ष अॅड. गौतम पाटील यांनी नियोजन सत्रासाठी शुभेच्छा दिल्या व मुंबई विद्यापीठाने जे. एस. एम. कॉलेज ला नियोजन सत्र आयोजित करण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त केले.
याप्रसंगी जे.एस. एम. महाविद्यालयाचे एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड यांची विभागीय समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली. व त्यांना मुंबई विद्यापीठाचा रायगड जिल्हास्तरीय उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मिळाला म्हणून मुंबई विद्यापीठाचे एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी श्री रमेश देवकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नियोजन सत्रामध्ये श्री रमेश देवकर यांनी राष्ट्रीय सेवा योजना उपक्रम, विद्यार्थी नोंदणी व कार्यक्रमांची रूपरेषा याबाबत माहिती दिली. त्यानंतर श्री निखिल कारखानीस यांनी एन.ई पी.2020 व राष्ट्रीय सेवा योजना याविषयी माहिती दिली.
श्री सुशील शिंदे यांनी माय भारत पोर्टल व एन. एस. एस. ऑडिट विषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. अश्विनी आठवले यांनी केले तर डॉ. प्रविण गायकवाड यांनी आभारप्रदर्शन केले.
सदर नियोजन सत्र जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अॅड. गौतमभाई पाटील आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सोनाली पाटील यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली
महाविद्यालयाचे एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी डॉ.
प्रविण गायकवाड, प्रा. अश्विनी आठवले, व डॉ. पंकज घरत आणि अन्य प्राध्यापक तसेच स्वयंसेवक यांनी यशस्वीरित्या पार पाडले.