निलोफर हमदुले यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षाच्या मुरुड तालुका महिला अध्यक्षपदी नियुक्ती……
निलोफर हमदुले यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षाच्या मुरुड तालुका महिला अध्यक्षपदी नियुक्ती……
कोर्लई(राजीव नेवासेकर) मुरुड येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षाच्या कट्टर समर्थक तथा सामाजिक कार्यकर्त्या निलोफर मुअज्जम हमदुले यांची मुरुड तालुका महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षाच्या रायगड जिल्हा अध्यक्षा दिपिका भंडारकर यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रांत म्हटले आहे कि,महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला कॉग्रेस पार्टीच्या निलोफर हमदुले यांची मुरुड तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब,महिलांच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजीया खान, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील व आपल्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल, पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी, पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपले सहकार्य राहील.असा मला विश्वास असल्याचे दिपिका भंडारकर यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे.निलोफर हमदुले यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार)पक्षाच्या महिला तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याबद्दल आप्तेष्ट नातेवाईक मित्र परिवार,पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.