रोहा तालुक्यातील शेडसई ग्रामपंचायत सदस्या प्राजक्ता कडू यांचे सदस्यपद अबाधित विरोधाकाना बसली चपराक……
रोहा तालुक्यातील शेडसई ग्रामपंचायत सदस्या प्राजक्ता कडू यांचे सदस्यपद अबाधित विरोधाकाना बसली चपराक……
रोहा(समीर बामुगडे) शेडसई ग्रामपंचायत कार्यालयात संगणक परिचालक पदावर काम करीत असताना त्याच ग्रामपंचायत मध्ये सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर एकच व्यक्ती दोन पदाचा लाभ घेऊ शकत नाही या अनुषंगाने तत्कालीन जिल्हाअधिकारी याचेकडे दिनेश कडू यानी याचिका दाखल केल्यानंतर प्राजक्ता प्रभाकर कडू यांना आपले सदस्य पद गमवावे लागले प्राजक्ता कडू यांनी या निकालाविरोधात वरिष्ठ कार्यालयात धाव घेतल्याने अतिरिक्त कोकण विभागीय आयुक्त यांनी प्राजक्ता प्रभाकर कडू यांना दिलासा देत त्याचे ग्रामपंचायत सदस्य पद अबाधित ठेवण्याचे आदेश दिले आहेत या निर्णयामुळे विरोधकांना चागली चपराक बसली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उत्साहाचे वातावरण पसरले आहे
रोहा तालुक्यातील बहुचर्चित ग्रामपंचायत शेडसईच्या कार्यालयात श्वीमती प्राजक्ता कडू या 2021पासून संगणक परिचालक व केद्र चालक म्हणून काम करीत होत्या सन 2021मध्ये झाले सार्वत्रिक निवडणुकीत त्या ग्रामपंचायत सदस्या म्हणून निवडून आल्यानंतर त्यानी उपसरपंच पददेखिल भूषवले संगणक परिचालक आणि ग्रामपंचायत सदस्य या दोन्ही लाभाच्या पदावर एकच व्यक्ती कार्यरत राहू शकत नाही म्हणून माजी सरपंच प्रिया कडू याचे पती दिनेश कडू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत त्याचे सदस्यपद रद्द करण्याची मागणी केली तत्कालीन जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी प्राजक्ता कडू यांचे सदस्यपद रद्द करण्याचा निर्णय दिला या निर्णया विरोधात प्राजक्ता कडू यांनी मुंबई विभाग अतिरिक्त विभागीय आयुक्त याचे कार्यालयात धाव घेत अपील दाखल करुन अॅड कमलेश घुमरे व अॅड सोनाली जाधव यांनी जोरदार युक्तिवाद करुन लेखीस्वरुपात म्हणणे सादर केले यात शासन निर्णयानुसार प्राजक्ता कडू याची नियुक्ती सीएससी एमपीव्ही या कंपनीमार्फत केलेली असून ते खाजगी उधोजक होते त्यामुळे केद्र चालक म्हणून ते शासनाच्या कोणत्याही सेवेत येत नसल्याचे दिसून येत आहे तसेच त्याना कंपनीने वेळोवेळी पगार दिले असल्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 14(फ)नुसार आपत्र ठरत नसल्यामुळे जिल्हाधिकारी रायगड याच्याकडील दि/9/10/2023रोजी आव्हानीत आदेश सदोष ठरत आहे अतिरिक्त विभागीय आयुक्त कोकण पानसारे यांनी 5ऑगस्ट 2024रोजी अपिलार्थी श्रीमती प्राजक्ता प्रभाकर कडू यांचा अपील मान्य करून त्याचे ग्रामपंचायत सदस्यपद अबाधित ठेवण्याचे आदेश दिले आहेत
तसेच या शेडसई ग्रामपंचायत निर्णय देतान रायगड जिल्हाअधिकारी यानी प्रथमदशनी निर्णय देताना या विषयाची सखोल शहानिशा केल्याची दिसून येत नाही आणि प्रथमदशनी निर्णय प्राजक्ता कडू याच्या बाजूनी दिला पाहिजे होता
या निर्णयामुळे शिदे गटाला मोठी चपराक बसली असून तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आनदाचा वातावरण पसरले आहे