तळा तालुक्यात मटका जुगार, राजरोसपणे सुरू, तळा पोलीसांना लाखोंचा हप्ता?पोलीस निरीक्षक सतिश गवई यांचे दुर्लक्ष अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याची नागरिकांची मागणी…..
[avatar]
तळा तालुक्यात मटका जुगार, राजरोसपणे सुरू,तळा पोलीसांना लाखोंचा हप्ता?पोलीस निरीक्षक सतिश गवई यांचे दुर्लक्ष अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याची नागरिकांची मागणी…..
तळा(नजीर पठाण)- तळा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बेकायदा मटका जुगार, चिमणी पाखरं बेकायदेशीरपणे चालू आहेत. या बेकायदेशीर अवैध धंद्यांमुळे या परिसरात कायदा सुव्यवस्था ढासळण्याची चिन्हे दिसू लागली असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत.
येथील बाजारपेठेत, बस स्टँडच्या मागे, चन्याच्या दुकानात, भेल वाल्याच्या बाजूला, पाटील याचा मटका जुगार राजरोसपणे सुरू आहे. तरुण आणि वयोवृद्ध माणसे येथे मोठ्या प्रमाणात मटका जुगार, आणि चिमणी पाखरं खेळण्यासाठी येत असून या अवैध धंद्यांच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. असे असताना देखील येथील पोलीसांनी लाखोंचा हप्ता घेऊन या अवैध धंद्यांना पाठबळ दिल्याचे दिसून येत आहे.परिणामी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करून हे अवैध धंदे बंद करण्यात यावे.