मुंबई गोवा हायवे , पाहणी दौरा चालू असताना सुसज्ज हॉस्पिटल करा,निवेदन , तहसीलदार यांना सुपूर्त केले- साईनाथ धुळे…..
[avatar]
मुंबई गोवा हायवे , पाहणी दौरा चालू असताना सुसज्ज हॉस्पिटल करा,निवेदन , तहसीलदार यांना सुपूर्त केले- साईनाथ धुळे…..
नागोठणे (विशेष प्रतिनिधी) मुंबई , गोवा हवे रोड जवळ एक मोठा सुसज्ज हॉस्पिटल करा गेले १७ वर्ष मुंबई – गोवा हवे रोड होत नाहीये, परंतु ह्या रोडवर आत्तापर्यंत मृत्यू चा आकडा हा ३५०० वर गेला असून व लाखो प्रवासी जखमी स्वरूपात झालेले आहेत, त्यात बरेचसे प्रवासी वेळेवर हॉस्पिटल न भेटल्यामुळे मृत्युमुखी पडले आहेत, या राष्ट्रीय महामार्गाचा गेले १७ वर्ष कोकणकर सामना करतोय, त्यांच्या जीवाशी सुरू झालेला हा खेळ कधी थांबणार, आमची व्यथा आम्ही तुमच्याकडे मांडत आहोत तुम्हीच आता आमचा प्रश्न सोडवा व आम्हाला सुसज्ज मोठा हॉस्पिटल मुंबई गोवा रोड जवळ करून द्यावा ही नम्र विनंती साहेब रायगड जिल्ह्याचा केंद्रबिंदू नागोठणे आहे तर या नागोठणे परिसरात हॉस्पिटल जर काय झालं तर खूप बर होईल ही आपणास नम्र विनंती आहे,
या वेळी श्री. शैलेश काळे , रोहा DY SP,डॉ. किशोर देशमुख , तहसीलदार,श्री. सचिन कुलकर्णी , नागोठणे पोलीस निरीक्षक, श्री. PI चव्हाण व सर्व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.