प्रचंड उकाड्यानंतर बरसल्या श्रावणधारा ! मुरुडकरांना दिलासा….. 

[avatar]

प्रचंड उकाड्यानंतर बरसल्या श्रावणधारा ! मुरुडकरांना दिलासा…..

कोर्लई(राजीव नेवासेकर) गेल्या आठवड्यापासून पावसाने जवळजवळ पाठ फिरवल्याने हवामानातील बदल होऊन घामाच्या धारांनी हैराण झालेल्या मुरुडकरांना अखेर आज दुपारनंतर श्रावणधारा बरसल्याने दिलासा मिळाला !
श्रावण महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होऊन हवामानात मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण झाली होती तर ३६ अंशाच्या वर पारा चढला होता.
उष्णतेच्या काहिलीने अनेकांनी घरातच राहाणे पसंत केले होते.त्यामुळे बाजारपेठेत तुरळक प्रमाणात गर्दी दिसून येत होती.

आज सकाळी पडलेल्या उन्हानंतर दुपारच्या वेळी हवामानात बदल होऊन प्रचंड उकाड्या नंतर श्रावण धारा बरसल्याने मुरुडकरांना दिलासा मिळाला.या श्रावणधारांमुळे शेतातील भात पिकालाही जिवदान मिळाले आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close