नागोठणे येथील अनाधिकृत मोबाईल टॉवर चे स्ट्रक्चर पूर्ण उतरवत नाहीत तोपर्यंत मनसे शांत बसणार नाही- साईनाथ धुळे……
नागोठणे येथील अनाधिकृत मोबाईल टॉवर चे स्ट्रक्चर पूर्ण उतरवत नाहीत तोपर्यंत मनसे शांत बसणार नाही- साईनाथ धुळे……
नागोठणे(विशेष प्रतिनिधी)महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रोहा तालुका अध्यक्ष श्री साईनाथ धुळे यांनी काही दिवसा पूर्वी नागोठणे येथील बिल्डिंग वरील अनाधिकृत मोबाईल टॉवर संदर्भात अमरण उपोषण केले होते,
त्यानंतर उपोषणाची दखल घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माननीय श्री अविनाश जाधव साहेब हे रोहा तहसीलदार
डॉ. किशोर देशमुख यांची भेट घेतली टॉवर संदर्भात कोणते परमिशन आहे हे दाखवा असे खडसावून सांगितले काही दिवसा मध्ये जर हा अनाधिकृत टॉवर उतरला नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तहसील कार्यालयावर मोर्चा काढेल असं स्पष्ट शब्दात इशारा दिला,
माननीय तहसीलदार साहेब यांनी अनाधिकृत मोबाईल टॉवर हटवा असे २७/०३/२०२४ रोजी पत्र देखील काढले होते,त्या नंतर
मनसे नेते श्री अविनाश दादा जाधव हे येऊन गेल्या वर शासनाने पत्रव्यवहार करीत घटनास्थळी
मा. नायब तहसिलदार P.B मोकल यांनी शासकीय परवानगी पत्र नसल्यामुळे उर्वरित काम पुढील आदेश येई पर्यंत बंद ठेवण्यात यावे अशा प्रकारचे लेखी जबाब
जमीन मालक श्री हसमुख चंपालाल जैन व मोबाईल टॉवर कंपनीचे प्रतिनिधी श्री. प्रकाश चव्हाण यांना समक्ष नोंदविलेले आहे व तशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत तरी चाललेल्या बेकायदेशीर टॉवर पुढील कार्यवाही १ ते १५७ पानाचा अहवाल माननीय नायब तहसीलदार यांनी मा. तहसीलदार साहेब यांच्याकडे अहवाल सादर केला आहे. असे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले,या सर्व घटनेचा स्वतः मनसे नेते श्री. अविनाश दादा जाधव पाठपुरावा घेत आहे असे धुळे म्हणाले, तहसीलदार साहेबांनी अनधिकृत टॉवर हटवा असे पत्र काढून देखील कोणीच दखल घेत नाही नक्की समजायचं काय हे अजूनही कळाला तयार नाही,परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीच कोणताच विषय अर्धवट सोडत नाही याचा पाठपुरावा करत राहू , येत्या काही दिवसांमध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून पुन्हा एकदा तहसील कार्यालयाच्या बाहेर उपोषण करणार आहोत असे देखील धुळे म्हणाले,टॉवर हटवण्याच्या मुद्द्यावर मनसे ठाम आहे व आक्रमक आहे हा लढा टॉवर हटेपर्यंत चालू राहील असे साईनाथ धुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.