त्वष्टा कांसार ज्ञाती समाज संस्था अष्टमी-रोहा यांच्या तर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न……
त्वष्टा कांसार ज्ञाती समाज संस्था अष्टमी-रोहा यांच्या तर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न……
रोहा (संतोष सातपुते)रोह्यात दरवर्षी त्वष्टा कांसार ज्ञाती समाज संस्था अष्टमी रोहा यांच्या तर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित केला जातो त्याप्रमाणे या वर्षी शुक्रवार दि. १६/०८/२०२४ रोजी सायंकाळी ठिक:- ०६:०० वा. समाजातील 10वी व 12वी परीक्षा उतीर्ण झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीचा आणि इतर प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता या कार्यक्रमाला प्रमूख पाहुणे अखिल महाराष्ट्र त्वष्टा कांसार संस्था अध्यक्ष श्री सतिश निजामपूरकर, सचिव अविनाश लांजेकर, विश्वस्त जयवंत खुळे, विश्वस्त नंदकुमार करडे, विश्वस्त गोरखनाथ कडू, सहसचिव रागेश वडके, आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत राहून त्यांच्या हस्ते विद्यार्थी व विद्यार्थिनी ना प्रमाणपत्र व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला
सदरहू कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्वष्टा कांसार ज्ञाती समाज संस्था अष्टमी अध्यक्ष श्री हेमंत साळवी, उपाध्यक्ष श्री प्रशांत बोथरे,चंद्रकांत कडू,सचिव मनोज वडके,सहसचिव प्रसाद खुळे,खजिनदार मनीष साळवी, सह खजिनदार दर्शन खुळे, सदस्य नारायण खुळे,प्रशांत तांबट,मयूर दांडेकर,व मिलेश साळवी आणि सर्व कार्यकारिणी, महिला अध्यक्ष व महिला कार्यकारिणी,समाजातील इतर मंडळांच्या सदस्यांनी मेहनत घेतली आणि गुणगौरव सत्कार सोहळा संपन्न झाला.
आपल्या समाजातील मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी समाजातील बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.