नागोठणे सर्कल ला चारी बाजूला गतिरोधक बसवणे- साईनाथ धुळे…..
नागोठणे सर्कल ला चारी बाजूला गतिरोधक बसवणे- साईनाथ धुळे…..
नागोठणे येथील अंबा नदी च्या पुढे जो रस्ता आहे ,नागोठणा ते मुंबई, नागोठणा ते रोहा आलिबाग,नागोठणा ते मुंबई गोवा हवे चार रोड आहे, त्या चारी बाजूंनी वेगाने गाड्या येतात रिलायन्स कंपनीतील अवजड वाहने देखील वेगाने येत असतात बाजूला शाळा आहे शाळेतील लहान मुलं कामगार वर्ग अन्य सर्वसामान्य लोक ये जा करत असतात, व मुस्लिम समाजाचा दर्गा देखील आहे चारी बाजूने सुसाट वेगाने गाड्या धावत असतात त्यामुळे अनेक अपघात घडत आहेत त्यामुळे गतिरोधक ची अत्यंत गरज आहे , असे मनसेचे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले व येत्या काही दिवसात चारी बाजूला जर गतिरोधक लागले नाही तर सर्व स्थानिक लोकांना घेऊन मनसे रस्त्यावर उतरेल असा इशारा पत्राद्वारे सार्वजनिक बांधकाम विभाग रोहा यांना कळविण्यात आले आहे व त्या संदर्भात अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा देखील झालेली आहे.