कर्जत येथील ” रक्षा” संस्थेच्या दोन शूरवीरांचा भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ वर्धापनदिन दिनानिमित्त श्री. सुमित हरि गुरव व श्री अक्षय गुप्ता यांचा सन्मान……
कर्जत येथील ” रक्षा” संस्थेच्या दोन शूरवीरांचा भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ वर्धापनदिन दिनानिमित्त श्री. सुमित हरि गुरव व श्री अक्षय गुप्ता यांचा सन्मान……
अलिबाग(विशेष प्रतिनिधी)भारतीय स्वातंत्र्याच्या 78 व्या वर्धापन श्री. सुमित हरि गुरव व श्री अक्षय गुप्ता यांचा सन्मान, अलिबाग येथे पोलीस ग्राउंड वर आयोजित केलेल्या कार्यक्रमात, कर्जत मधील श्री. सुमित हरि गुरव व श्री अक्षय गुप्ता यांचा सन्मान करण्यात आला. सुमित गुरव व अक्षय गुप्ता हे कर्जत येथील “रक्षा सामाजिक विकास मंडळ” या संस्थेचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. यावर्षी पावसाळ्यामध्ये उत्पन्न झालेली पूर परिस्थिती व विविध आपत्कालीन परिस्थितीत स्वतःच्या जीवावर उदार होऊन सह्याद्रीच्या खडतर डोंगर रांगांमध्ये केलेले शोध व बचाव कार्य व आत्तापर्यंत करत आलेल्या देश सेवेबद्दल यांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मंत्री आदितीताई तटकरे, रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. किसन जावळे,जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला.
सुमित गुरव यांनी गिर्यारोहणाचे प्राथमिक प्रशिक्षण अधिकृत गिर्यारोहण संस्थेतून, जम्मू काश्मीर येथे घेतले आहे. याचबरोबर वायरलेस कम्युनिकेशन याचे प्रशिक्षण रायगड जिल्हाधिकारी कार्यालय येथून घेतलेले आहे. व त्यांनी अग्निशामन दलाचे प्रशिक्षणही पूर्ण केले आहे. आणि याच बरोबर ते रायगड जिल्हा साठी ते अधिकृतरित्या “आपदा मित्र” म्हणून कार्यरत आहेत. तर अक्षय गुप्ता हे उत्तम गिर्यारोहक आहेत व उत्तम प्रकारचे सर्पमित्रही आहेत.
यावर्षी जुलै महिन्यात पोसरी बेंडसे येथे एक व्यक्ती उल्हास नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून जात असताना त्याला सुरक्षितरीत्या जिवंत बाहेर काढण्यात केलेले सहकार्य, तसेच माळशेज घाटातील हरिश्चंद्र गडावरील कोकणकडा येथे एक व्यक्ती 1400 फूट खोल पडली होती त्यावेळेस केलेले सहकार्य ,याचबरोबर ढाक भैरी येथे अडकलेल्या तीन युवकांना सुखरूपपणे बाहेर काढल्याबद्दल श्री सुमित गुरव व अक्षय गुप्ता यांचा सन्मान आज भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ वा वर्धापन दिनानिमित्त अलिबाग येथे करण्यात आला.