श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून निष्ठा वाघमारेला उच्च शिक्षणासाठी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत…… 

[avatar]

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून निष्ठा वाघमारेला उच्च शिक्षणासाठी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत……

पनवेल(प्रतिनिधी) परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी नवीन पनवेल येथील निष्ठा जितेंद्र वाघमारे या विद्यार्थिनीला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. सदरचा धनादेश माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज (दि. १३) निष्ठा वाघमारे हिला सुपूर्द केला.  
                 सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य अशा विविध क्षेत्रात गेल्या तीन दशकपेक्षा जास्त वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन स्वतः च्या पायावर उभे केले जाते. निष्ठा ही एमबीबीएस हे वैद्यकीय शिक्षण जॉर्जिया या देशातील एस.ई.यु युनिव्हर्सिटीमध्ये घेणार आहे. त्यासाठी तिला आर्थिक मदतीची आवश्यकता होती. त्यानुसार तिला मदत करण्यात आली असून मदतीचा धनादेश माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी निष्ठाचे अभिनंदन करुन तीला पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेवीका वृषाली वाघमारे, नीता माळी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्ञानेश्वर घरत आदी उपस्थित होते.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close